आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्ट्रोव्हर्सीजसाठी ओळखली जाते ही PAK मॉडेल, न्यूड फोटोशूटमुळे एकवटली होती चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी न्यूड फोटोशूट करुन वादात अडकलेली पाकिस्तानी मॉडेल मथिरा खान हिने भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाविषयी मत व्यक्त केले आहे. तिने ट्विटर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने एका मुलाला झोपलेले तर एका जवानाला शहीद झालेले दाखवले आहे. मथिराने फोटोसोबत लिहिले, "सत्य हे आहे, की दोन्ही जवान आपापल्या देशाच्या सुरक्षेसाठी शहीद झाले आहेत. प्रत्येक जीवाचे मोल आहे. मग तो पाकिस्तानी असो वा इंडियन."

बॉलिवूडमध्ये केलंय काम...
मथिराने 2013 मध्ये यंग मलंग या पंजाबी सिनेमात एक आयटम नंबर केला होता. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2014मध्ये विपिन शर्माच्या सिनेमातून मथिराने बॉलिवूडमद्ये पदार्पण केले होते. विपिनने अक्की ते विक्की ते निक्की नावाचा एक सिनेमा दिग्दर्शित केला होता. मात्र या सिनेमाच्या रिलीजविषयीची माहिती उपलब्ध नाहीये. खरं तर मथिराला कॉन्ट्रोव्हर्सीजसाठी ओळखले जाते. पाकिस्तानी वाहिनीवरील तिच्या एका चॅट शोला विरोधाचा सामना करावा लागला आहे, शिवाय न्यूड फोटोशूट व्हायरल करुनसुद्धा तिने चर्चा एकवटली आहे.

मथिराच्या न्यूड फोटशूटमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली होती. तिच्यावर टीकेची झोड उठली होती. 2013 मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मथिराने म्हटले होते, "होय मी बोल्ड आहे आणि बोल्ड असणे काही पाप नाही."
मी न्यूड नव्हते...
मथिरा मुलाखतीत म्हणाली होती, "एका पाकिस्तानी मॅगझिनच्या कव्हर पेजवर प्रकाशित झालेल्या माझ्या छायाचित्राला न्यूड म्हटले गेले, मात्र ते न्यूड नव्हते. फोटोशूटमध्ये माझे अंग झाकले होते. माझ्यासमोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मला पकडले होते. त्यामुळे मी मागून टॉपलेस दिसली होती. पण मी न्यूड नव्हती."

विवाहित आहे मथिरा
झिम्बाबेच्या हरारे शहरात जन्मलेली मथिरा पाकिस्तानी आई आणि आफ्रिकन वडिलांची संतान आहे. ती 13 वर्षांची असताना तिचे कुटुंब पाकिस्तानात शिफ्ट झाले. 2012 मध्ये मथिराचे लग्न झाले असून 2014 मध्ये तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, होश उडवणारे मथिराचे बोल्ड फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...