आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे बॉलिवूडची 'राधे माँ', हॉट फोटोशूट आणि आयटम नंबरमुळे असते प्रसिद्धीझोतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः नेहमी वादात राहणारी राधे माँ आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे एक जुने भक्त एमएम मिठाईवालाचे मालक मनमोहन गुप्ता यांनी तिच्यावर त्यांचा बंगला बळकावल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. तिच्याविरोधात मुंबईतील बोरीवली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसे पाहता, बॉलिवूडमध्येसुद्धा एक अशी अॅक्ट्रेस आहे, जिने अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर 'ओह माय गॉड' या सिनेमात राधे माँशी साधर्म्य साधणारी भूमिका साकारली होती. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री पूनम झावर हिच्याविषयी...

जेव्हा पूनम म्हणाली, मीच खरी राधे माँ...
गेल्यावर्षी ट्विटरवर राधे माँची मिनी स्कर्टमधील छायाचित्रे प्रकाशित झाल्यानंतर पूनमने ट्विटरवर स्वतःची छायाचित्रे अपलोड करुन 'मी आहे खरी राधे माँ' असे ट्विट केले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती.
पूनमने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात अक्षय कुमारच्या 'मोहरा' या सिनेमातून केली होती. मात्र तिला ओळख मिळाली नव्हती. त्यानंतर तिने सिनेमांमध्ये आयटम नंबर करणे सुरु केले होते. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी पूनम अधूनमधून हॉट फोटोशूट्स करत असते.

कोण आहे पूनम झवर?
पूनमचा जन्म 14 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. पूनमचे कुटुंब मुळचे राजस्थानमधील आहे. मात्र तिचे बालपण मुंबईत गेले. पूनमने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली होती. त्यानंतर तिला 'मोहरा' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. मात्र या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळू न शकल्याने ती आयटम नंबरकडे वळली. त्यानंतर तिला प्लेबॉय या मासिकासाठी फोटोशूट करण्याची ऑफर मिळाली होती. ती तिने स्वीकारली नाही. कारण या मासिकासाठी तिला न्यूड फोटोशूट करण्याची अट घालण्यात आली होती.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पूनम झावरे हॉट फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...