मुंबई- अलीकडेच एका अवॉर्ड नाइटमध्ये परफॉर्मन्सदरम्यान जेव्हा रणवीर सिंहने जमीनीवर झोपून अमिताभ बच्चन यांच्या पायाला स्पर्श केला. यावर अमिताभ त्याला म्हणाले, आरामात स्पर्श कर, माझ्या पायाला हात लागला नाही पाहिजे. अमिताभ बच्चन या इव्हेंटमध्ये खास शूज घालून आले होते. हा शूज बॅलेरीनासारखे होते.
या इव्हेंटसाठी बिग बींनी विशेष शूज बनवले होते...
सूत्रांच्या सांगण्यानुसार, इव्हेंटसाठी बच्चन यांनी हे खास शूज बनवून घेतले होते. दीपिका पदुकोणने विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, की कोलकातामध्ये शूटदरम्यान ते ट्रामवर कोसळले होते आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे पायाला बँडेज बांधावे लागले. म्हणून ते साधे बुट घालू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी नवीन शूज डिझाइन करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटदरम्यान रणवीर आणि बिग बीचे काही फोटो...