आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Shraddha Kapoor Almost Stopped The Traffic In Malaysia

जेव्हा मलेशियाच्या रस्त्यांवर शक्ती कपूरच्या लेकीने थांबवले ट्रॅफिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मलेशियाच्या रस्त्यावर श्रद्धा कपूर)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या आठवड्यात इंटरनॅशनल इंडियन फिल्म्स अकॅडमी (IIFA) अवॉर्ड्स सोहळ्यासाठी कुआलालंपुर, मलेशिया येथे गेली होती. यावेळी ती तेथील रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसली. रस्ता क्रॉस करत असताना श्रद्धा चक्क हात दाखवून ट्रॅफिक थांबवताना दिसली. तिची या मलेशिया टुरची काही छायाचित्रे समोर आली असून यामध्ये श्रद्धा रस्ता ओलांडताना ट्रॅफिक थांबवताना दिसतेय.
श्रद्धा सध्या आपला आगामी 'एबीसीडी 2' हा सिनेमा रिलीज होण्याची वाट बघत आहे. या सिनेमात वरुण धवन तिचा को-स्टार आहे. डेमो डिसुजा दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 26 जून रोजी रिलीज होतोय. वरुण आणि श्रद्धासह प्रभूदेवा आणि लॉरेन गॉटलिएब यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मलेशिया रस्त्यांवर क्लिक झालेली श्रद्धाची खास छायाचित्रे...