आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्रीवर लागला होता अनैतिक संबंधाचा आरोप, 3 वर्षांसाठी झाली होती बॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकिता ठकराल - Divya Marathi
निकिता ठकराल
मुंबई: 'उडता पंजाब' आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातील वाद अद्याप सुरुच आहे. मागील दिवसांत पंजाबमध्ये हा सिनेमा बॅन करण्याची मागणी करण्यात येत होती. हे झाले सिनेमाविषयी, परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, की एक अशी अभिनेत्री आहे, तिला एका अभिनेत्यासोबच अनैतिक संबंध ठेवल्याच्या आरोपात फिल्म इंडस्ट्रीने तीन वर्षांपूर्वी बॅन केले होते. ही अभिनेत्री यावर्षी 'ट्रॅफिक' सिनेमात झळकली आहे. यापूर्वी तिने तामिल, तेलगू, मल्याळम आणि कानडी भाषेतील अनेक सिनेमांत काम केले आहे. ती दाक्षिणात्य अभिनेत्रींमध्ये प्रसिध्द आहे.
कोण आहे ही अभिनेत्री, काय झाले होते तीन वर्षांपूर्वी...
या अभिनेत्रीचे नाव निकिता ठकराल आहे. तिला जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला आणि ती मुंबईत राहते. 2002मध्ये तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली आणि आतापर्यंत अनेक सिनेमांत काम केले आहे. निर्माता डी रामा नायडूने तिला जुहूच्या (मुंबई) एका हॉटेलमध्ये पाहिले आणि 'Hai' (2002) सिनेमासाठी साइन केले. हा सिनेमा फ्लॉप झाला. परंतु निकितासाठी इंडस्ट्रीची दारे खुली झाली. त्यानंतर तिने तामिळ, तेलगू, कानडी आणि मल्याळम सिनेमांत कामे केली.
काय आहे बॅन कॉन्ट्राव्हर्सी...
रिपोर्ट्सनुसार, 2011मध्ये निकितावर कानडी अभिनेता टी दर्शनसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप लावण्यात आला होता. हा आरोप दर्शनची पत्नी लक्ष्मीने लावला होता. तिच्या सांगण्यानुसार, निकितासोबत संबंध असल्याने दर्शन तिला मारहाण करत होता.
विजयलक्ष्मीने या प्रकरणात दर्शनच्या विरोधात कौटुंबीत हिंसेची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दर्शनला अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर विजयलक्ष्मीने तक्रार मागे घेतली आणि दर्शनची सुटका झाली. परंतु अनैतिक संबंधाच्या आरोपात निकिता अडकली. कानडी फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशनने तिला 10 सप्टेंबर 2011पासून तीन वर्षे इंडस्ट्रीमधून दूर
राहण्यास सांगितले. म्हणजे तिला बॅन केले.
असोसिएशनच्या या निर्णयाचा इंडस्ट्रीच्या आणि इतर सेलेब्सने विरोध केला. इतकेच नव्हे तर बंगळुरु शेकडो लोकांनी विरोध दर्शवण्यासाठी प्रदर्शननेसुध्दा केली. लोकांना अडवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जसुध्दा केला होता. लोकांचे म्हणणे होते, की प्रेमसंबंध पर्सनल गोष्ट असते. त्यात एखाद्या अभिनेत्रीला बॅन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. सर्वत्र विरोध चालू असल्याने पाच दिवसांनी अभिनेत्रीवरील बॅन काढण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल झाली होती निकिता...
बॅन केल्याची वार्ता ऐकताच निकिताची तब्येत बिघडली. लो ब्लड प्रेशर आणि तणावाने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निकिता ठकरालचे ग्लॅमरस PHOTOS...