आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा या TV अॅक्ट्रेस ने केली धुलाई, अशी होती बॉबी देओलची Reaction

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉबी देओल आणि समीक्षा भटनागर. - Divya Marathi
बॉबी देओल आणि समीक्षा भटनागर.
मुंबई - 'एक वीर की अरदास : वीरा' (2012-13) आणि 'देवो के देव...महादेव'(2013-14) अशा मालिकांमध्ये काम केलेली समिक्षा भटनागर अपकमिंग चित्रपट 'पोस्टर बॉइज'मध्ये बॉबी देओलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, चित्रपटाच्या एका सीनमध्ये चुकून तिने बॉबी देओलला मारहाण केली होती. पण नंतर तिने पुन्हा पुन्हा माफी मागितली होती. 

का मारली समिक्षाने थापड.. 
- रिपोर्ट्सनुसार चित्रपटाच्या एका सीनमध्ये समीक्षाला बॉबी देओलवर नाराज व्हायचे होते. पण तो सीन करण्यात ती एवढी गुंग झाली की, तिने बॉबी देओलला चक्क मारहाण केली. त्यात बॉबी देओलला थोडे लागलेही होते. 
- न्यूकमर असल्याने मिक्षा या प्रकाराने गोंधळून गेली होती. पण बॉबीने तिला सांभाळले आणि काहीही झाले नसल्याचे सांगितले. 

वातावरण हलके करण्यासाठी बॉबॉने सांगितले जोक.. 
- समीक्षा म्हणाली, बॉबीला लागले होते, तरीही त्याने तसे दाखवले नाही. नंतर सीन अगदी छान झाला. मी अनेकदा बॉबीची माफी मागितली. पण त्याने सर्वकाही अगदी सहज घेतले. वातावरण हलके व्हावे म्हणून बॉबीने तिला अनेक जोक्सही सुनावले. 

या मालिकांतही समिक्षाने केले आहे काम. 
- समीक्षा ने '...वीरा' आणि 'देवों के देव...' शिवाय 'बाल वीर' (2011-12), 'कुमकुम भाग्य' (2014), 'नीली छतरी वाले' (2014-15), 'गुपचुप' (2016) मध्ये काम केले आहे. 
- बॉलिवूड मुव्ही 'कॅलेंडर गर्ल्स' (2015) मध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, समिक्षा भटनागर हिचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...