आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • When Zareen Khan Was Nearly Molested By Stranger, Makers Were Busy Drinking Beer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅक्ट्रेसचा दावा - जेव्हा माझी छेडछाड सुरु होती, तेव्हा निर्माता बियरचे घोट घेत होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झरीन खान - Divya Marathi
झरीन खान

मुंबई - 'अक्सर-2'ची हिरोईन झरीन खानचे म्हणणे आहे, की जेव्हा दिल्लीत तिच्यासोबत छेडछाड सुरु होती, तेव्हा फिल्म मेकर्स बियरचे घोट घेण्यात बिझी होते. एंटरटनमेंट वेबसाइट स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत अॅक्ट्रेसने दावा केला, की दिल्लीत फिल्मच्या प्रमोशनवेळी तिच्यासोबत छेडछाड केली गेली. यावेळी फिल्मचा एकही पुरुष सदस्य तिच्यासोबत नव्हता. तर, फिल्मचा निर्माता शाम बजाज यांनी हे सर्व खोटे असल्याचे म्हटले आहे. 

 

काय म्हटले प्रोड्यूसर 
- प्रोड्यूसरच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार, झरीनला संपूर्ण टूरचा शेड्यूल दोन दिवस आधीच दिला होता. मात्र तिने सर्व कमिटमेंट्स मोडले, एवढेच नाही तर प्रेस कॉन्फरन्स आणि स्पॉन्सर व्हिजीटलाही नकार दिला. तिने पूर्णपणे प्रमोशनही केले नाही.
- दुसरे असे, की झरीनने जो छेडछाडीचा दावा केला, तो पूर्ण खोटा आहे. कारण तिने स्पॉन्सर्ससोबत वाद घातला आणि कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेली. तिला तिथे थांबायचे नव्हते आणि तिथले जेवणही घ्यायचे नव्हते. ती तिच्या चार बॉडिगार्ड आणि मॅनेजरसोबत निघून गेली होती. 
- ज्या स्पॉर्नर्ससोबत तिने वाद घातला त्यांच्याच कारमध्ये जाऊन ती बसली होती. तेव्हा त्यांनी कारची चावी काढून घेतली. त्यानंतर निर्मात्यांनी तिच्यासाठी दुसऱ्या कारची व्यवस्था करुन दिली आणि तिला सुरक्षित हॉटेलपर्यंत पोहोचवले.

 

झरीनने काय सांगितले...
झरीनने सांगितल्यानुसार, निर्मात्यांनी स्पॉन्सर्ससोबत कमिटमेंट केली होती, मात्र मला काहीच सांगितले नाही. ते मला स्पोन्सर्ससोबत चर्चेसाठी वेन्यूला घेऊन गेले. तिथे मेकर्स जेवण्या-खाण्यात गुंतले होते. दारू पित बसले होते. एका महिलेसोबत वागण्याची ही पद्धत असते का? 
- कोणीही मला थांबवण्यासाठी आले नाही. जेव्हा मी कारजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी (स्पॉन्सर्स) चावी काढून घेतली. तिथे सुरक्षेची पुरेशी व्यवस्था नव्हती. गर्दी एवढी होती की ती माझ्या अंगावर येऊ लागली होती. मी सुरक्षा रक्षकांना एक कार मागितली आणि कशीतरी हॉटेलवर पोहोचले. लागलीच मी मुंबईला रवाना झाले. मात्र माझ्या स्टाफचे परतीचे तिकीट नसल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी परत आले. 
- निर्मात्यांनी माझ्या स्टाफचे पेमेंटही केले नाही.  

बातम्या आणखी आहेत...