आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी जिममध्ये काम करायचा हा मराठी अभिनेता, आज आहे बाहुबलीचा लय भारी 'आवाज'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ‘बाहुबली 2’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना गवसलंय. सिनेमातील भूमिकांसाठी प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया, रम्या कृष्णन, सत्यराज या कलाकारांचे विशेष कौतुक होतंय. मात्र या सर्वच कलाकारांसोबत एका मराठमोळ्या नावाचीही सध्या खूप चर्चा होतेय. आम्ही बोलतोय ते मराठमोळा अभिनेता शरद केळकर याच्याविषयी. हिंदी सिनेमात बाहुबलीच्या भारदस्त आवाजामागे शरद केळकरचा आवाज आहे. शरदने हिंदी व्हर्जनसाठी डबिंग केलंय. प्रभासने साकारलेल्या बाहुबली या भूमिकेसाठी त्याने आवाज दिला आहे. मुळचा मध्यप्रदेशातील असलेल्या शरदच्या मते, तो मध्यप्रदेशातील असल्याने त्याची हिंदी भाषा चांगली आहे. 
 
मराठी कुटुंबात झाला जन्म...
- 7 ऑक्टोबर 1976 रोजी एका मराठी कुटुंबात शरदचा जन्म झाला. 
- शरदच्या बालपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. आई आणि बहीण प्रेरणा असल्याचे तो सांगतो. 
बातम्या आणखी आहेत...