आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेकने केली नसती \'ती\' चूक तर अभिषेकची नव्हे त्याची असती ऐश्वर्या !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐश्वर्या रॉय बच्चन आज जरी अभिषेकची पत्नी आणि बच्चन परिवाराची सून आहे तरी एकेकाळी अशीही वेळ होती की ऐश्वर्या अभिनेता विवेक ऑबेरॉयसोबत रिलेशनशीपमध्ये होती. ऐश्वर्याचे सलमानबरोबर 1999 सालापासून अफेअर होते जे 2001 पर्यंत चालले. यानंतर सलमानच्या चिडक्या स्वभावामुळे ऐश्वर्या त्याच्यापासून दूर झाली. ऐश्वर्या आणि विवेकने 'क्यों हो गया ना' चित्रपटात सोबत काम केले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. ऐश्वर्याच्या 30 व्या वाढदिवशी विवेकने तिला 30 गिफ्ट दिले होते. एका चुकीमुळे विवेकपासून दूर झाली ऐश्वर्या..
 
- ऐश्वर्याने कधीही कबुल केले नाही की ती विवेकसोबत रिलेशनशीपमध्ये आहे पण प्रत्येक फंक्शनमध्ये ते दोघे सोबत असत. 
- विवेकला ऐश्वर्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती. 
- 2003 साली विवेकने एका हॉटेल रुममध्ये प्रेस कॉन्फ्रंस बोलवली होती आणि महटले होते की ऐश्वर्या आणि मी सोबत आल्यामुळे सलमानने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  सलमानने नशेमध्ये असताना जवळपास 41 कॉल केल्याचे त्याने सांगितले. 
- यानंतर ऐश्वर्याने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली कारण तिला कोणत्याच प्रकारच्या वादात पडायचे नव्हते. ऐश्वर्याने विवेकला तो इममॅच्युअर पर्सन असल्याचे सांगितले. 
- विवेकने ऐश्वर्याला म्हटले 'प्लास्टिक अॅश'
- एका मुलाखतीत विवेकने ऐश्वर्याला 'प्लास्टीक अॅश' असे म्हटले होते. तिला त्याने 'प्लास्टिक हार्ट' आणि 'प्लास्टिक स्माइल' असेही म्हटले होते. 
 
विवेकने मान्य केली त्याची चूक
- एका मुलाखतीत विवेकने फराहच्या एका टॉक शो मध्ये कबुल केले होते की त्याने ती प्रेस कॉन्फरन्स करायला नको होती. त्याने या प्रेस कॉन्फरन्समध्ये अशा अनेक गोष्टी बोलल्या ज्या त्याने बोलायला नको होत्या.
 
 जेव्हा अवॉर्ड फंक्शनमध्ये उडवली गेली विवेकची खिल्ली
 विवेकने सांगितल्यानुसार, त्या प्रेस कॉन्फरन्सनंतर प्रत्येक अवॉड फंक्शनमध्ये माझा मजाक उडवला गेला. मला अवॉर्ड शोमधून फोन यायचे की तुम्हाला अवॉर्ड मिळाला आहे पण नंतर काही वेळातच मला निरोप यायचा अवॉर्ड शोमध्ये येऊ नका आणि त्यानंतर हा अवॉर्ड दुसऱ्या कोणाला दिला गेला. 
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, ऐश्वर्या-सलमानचे वेगळे होण्याची कारणे..
बातम्या आणखी आहेत...