आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Is Katrina Kaif In No Mood To Meet Convict And Alleged Ex Boyfriend Salman Khan?

पडत्या काळात 'सल्लू'ने दिली होती साथ, पण निकालानंतर भेटायलाही आली नाही 'कॅट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खान एका मेंटरप्रमाणे कतरिना कैफच्या करिअरला यशोशिखरावर पोहोचवण्यासाठी नेहमी मदत करत आला आहे. कतरिनाच्या वाईट काळाच सलमानने तिला नेहमी साथ दिली. मात्र सलमानवर वाईट वेळ आली तर कतरिनाने त्याच्याकडे वळूनदेखील पाहिले नाही.
13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणात सलमान खान सत्र न्यायालयात दोषी ठरवून 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा कोर्टाचा निर्णय ऐकताच अनेक बॉलिवूडकरांनी सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटकडे धाव घेतली. मात्र यादरम्यान कतरिना कैफ सलमानला दिलासा देण्यासाठी पोहोचली नाही.
रिपोर्ट्सनुसार, सलमानला दोन दिवसांचा अंतरिमा जामीन मिळाल्याचे कळताच बॉलिवूड सेलेब्सनी सलमानच्या घरी त्याची भेट घेण्यासाठी गर्दी केली. प्रिती झिंटा, राणी मुखर्जी, बिपाशा बसु, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलेब्स सलमानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. परंतु सूत्रांच्या सांगण्यानुसार, कतरिनाने त्याच्याविषयी काहीच माहिती करून घेतली नाही.
विशेष म्हणजे, निकालाच्या एकदिवस आधी मंगळवारी (5 मे) सलमानचे क्लोज फ्रेंड्स त्याला भेटण्यासाठी घरी पोहोचले होते. तसेच शाहरुख खाननेसुध्दा सलमानची मंगळवारी रात्री भेट घेतली. मात्र मुंबईमध्ये राहत असून कतरिना सलमानला भेटण्यासाठी आली नाही. तिने सलमानने भेटण्याऐवजी फिल्मी स्क्रिनिंग अटेंड केली.
सलमान आणि कतरिना यांच्या ब्रेकअपनंतर दोघे चांगले मित्र आहेत. कतरिना त्याच्या कुटुंबीयांशी कनेक्ट आहे. अशाच कतरिना सलमानला भेटण्यासाठी का आली नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. 1998मध्ये जेव्हा सलमानने कारावास झाला होता तेव्हा कतरिनाने त्याला पूर्ण सपोर्ट केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सलमानला भेटण्यासाठी जोधपूर तुरुंगात पोहोचली होती कतरिना...