आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: पैशांसाठी यशराज फिल्म्सने दिला सलमानला धोका!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि आदित्य चोप्रा - Divya Marathi
सलमान खान आणि आदित्य चोप्रा
मुंबई: बॉलिवूडचा 'सुल्तान' अर्थातच सलमान खानसोबत यशराज फिल्म्सने चीटिंग केली आहे. बातम्यांनुसार, यशराज फिल्म्सकडून 'सुल्तान'ची कमाई खूप कमी सांगितली जात आहे. परंतु बॉक्स ऑफिसचे खरे कलेक्शन वेगळेच आहे. सुल्तान लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. सध्या सिनेमाची कमाई 298 कोटींच्या जवळपास आहे.
सलमानला हवी होती शाहरुख, आमिरसारखी डील...
एका लोकप्रिय वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार, यशराज फिल्म्स आणि सलमान खान यांच्यात डील झाली होती. त्यानुसार, जर सिनेमा 300 कोटींच्या पुढे गेला तर सलमानला पार्टनरशिपमध्ये वाटा मिळेल. जेव्हा आदित्य चोप्राने 'सुल्तान'साठी सलमानला संपर्क केला, तेव्हा सलमानने स्पष्ट सांगितले होते, की त्याला शाहरुख (फॅन) आणि आमिर (धूम 3) सारखी डील हवी आहे. त्या सांगण्यानुसार, नफ्यात 80-20 टक्के प्रॉफिट शेअरिंग असेल.
यापूर्वीही सलमानसोबत असे झालेय...
आदित्य चोप्रा सलमानच्या डीलशी सहमत झाला होता. कारण मोठे स्टार्स आजकाल प्रॉफिटमध्ये आपला भाग घेतात. परंतु आता यशराज फिल्म्स सुल्तानचा नफा कमी झाल्याचे सांगत आहेत. सलमानच्या 'एक था टायगर' सिनेमावेळीसुध्दा असेच घडले होते. ट्रेड अॅनालिस्टने सिनेमाची कमाई 200 कोटींपेक्षा जास्त सांगितली होती. परंतु यशराज फिल्म्सने 199.6 कोटी कमाई झाल्याचे सांगितले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सुल्तान'चे काही स्टिल्स...
बातम्या आणखी आहेत...