आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा या प्रसिद्ध गायकाने नाकारला माधुरी दीक्षितच्या लग्नाचा प्रस्ताव, वाचा नेमके घडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माधुरी दीक्षितबाबत सध्या एक स्टोरी चांगलीच व्हायरल होत आहे. त्यानुसार माधुरी दीक्षितच्या लग्नासाठी त्याकाळचे प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडे प्रपोजल पाठवण्यात आले होते. पण सुरेश वाडकर यांनी नकार दिला होता. मुलगी फार सडपातळ आहे असे सांगत त्यांनी नकार दिला होता. 

चित्रपटात करिअर करायला होता आई वडिलांचा विरोध 
- रिपोर्ट्सनुसार माधुरीने चित्रपटांत करिअर करू नये अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुरेश वाडकर यांच्यावर येऊन तो शोध थांबला. 
- माधुरी(50) सुरेश (62) पेक्षा 12 वर्षांनी छोटी आहे. सुरेश यांनी लग्नाला नकार दिल्याने माधुरीच्या आईवडिलांच्या चिंता अधिकच वाढल्या. त्यांना वाटू लागले होते की, जर माधुरीने चित्रपटांत जास्त काम केले तर तिच्या लग्नात अडचणी निर्माण होऊ शकतील.  

लंडनच्या डॉक्टरबरोबर झाले माधुरीचे लग्न 
- ऑक्टोबर 1999 मध्ये माधुरीने लंडनमधील डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यांना आथा अरीन (14) आणि रायन (12) अशी दोन मुले आहेत. 
- 'लगी आज सावन की' (चांदणी 1989), 'ओ रब्बा कोई तो बताए' (संगीत 1991) आणि 'सपने में मिलती है' (2011) सारख्या गाण्यांचे गायक सुरेश वाडकर यांनी नंतर त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी छोटी शिष्या पद्मा हिच्याशी लग्न केले. त्यांना अनन्या और जिया अशा दोन मुली आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, माधुरी आणि सुरेश वाडकर यांच्या कुटुंबाचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...