आयफा अवॉर्ड्स 2017 चा दिमाखदार सोहळा नुकताच न्यूयॉर्क येथे पार पडला. या सोहळ्यात कोण-कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आयफा पुरस्कार अभिनेता शाहिद कपूरला 'उडता पंजाब' सिनेमासाठी मिळाला आहे. तर याच सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भटने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा ठरला 'नीरजा'. 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमासाठी प्रीतमला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. वरुण धवनने 'ढिशूम' सिनेमासाठी विनोदी कलाकाराचा पुरस्कार आपल्या नावी केला. विशेष म्हणजे वरुणचा हा पहिला आयफा पुरस्कार आहे. 25 वर्षांच्या सांगितिक प्रवासाबद्दल ए. आर रेहमानचा यांचा सत्कार करण्यात आला.
अवॉर्ड नाइटचा पहिला परफॉर्मन्स आलिया भटने सादर केला. तिच्या गाण्यात तिने वरुण धवनलाही सहभागी करुन घेतले आणि त्याच्यासोबत डान्स केला. तर अभिनेता सलमान खान, शाहिद कपूर, कतरिना कैफ, किर्ती सेनन, सुशांत सिंह राजपूत या कलाकारांनीही त्यांच्या सादरीकरणाने सोहळ्याला चारचाँद लावले.
या पॅकेजमध्ये वाचा, आयफा 2017च्या विजेत्यांची संपूर्ण यादी... आणि सोबतच छायाचित्रांमध्ये बघा, कसा रंगला यंदाचा सोहळा...
विजेत्यांची संपूर्ण यादी-
>> सर्वोत्कृष्ट सिनेमा- नीरजा
>> सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहिद कपूर (उडता पंजाब)
>> सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट (उडता पंजाब)
>> सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अनिरुद्ध रॉय चौधरी (पिंक)
>> सर्वोत्कृष्ट सहकलाकार अभिनेता - अनुपम खेर (एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी)
>> सर्वोत्कृष्ट सहकलाकार अभिनेत्री- शबाना आझमी (नीरजा)
>> सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता)- दिलजीत दोसांज (उडता पंजाब)
>> सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - दिशा पटानी- एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी
>> मिंत्रा स्टाईल आयकॉन- आलिया भट
>> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- तुलसी कुमार (एअरलिफ्ट)
>> सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- कनिका कपूर (उडता पंजाब)
>> सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका- जिम सर्भ (निरजा)
>> सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार- वरुण धवन (ढिशूम)
>> सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- प्रितम (ऐ दिल है मुश्किल)
>> सर्वोत्कृष्ट गीतकार- अमित भट्टाचार्य (चन्ना मेरे या..- ऐ दिल है मुश्किल)
>> वुमन ऑफ द इयर- तापसी पन्नू (पिंक)
पुढील स्लाईड्सवर बघा, आयफा 2017 च्या अवॉर्ड नाइटची खास झलक छायाचित्रांमध्ये...