आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कटप्पाच का इतर कुणीही मारू शकतो बाहुबलीला?\', लेखकाने उपस्थित केला प्रश्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली' सिनेमा सर्वांनीच पाहिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या सिनेमाविषयी अनेकांच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया गेल्या महिन्याभरापासून येत आहेत. फनी ते वैचारिक प्रतिक्रियेपर्यंत अनेक रिअॅक्शन प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर आल्यात. यात 'कटप्पा'ने 'बाहुबली'ला का मारले याचे विविध पध्दतीने प्रश्न विचारण्यात आले. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतल्या एका चॅनेलने सिनेमाच्या लेखकाला 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' हा प्रश्न विचारला.
या प्रश्नाचे उत्तर देताना लेखक के. व्ही विजेंद्र प्रसाद म्हणाले, 'बाहुबली सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये एक व्यक्ती बाहुबलीवर तलवारीने वार करताना दिसतो. पण यावरून तुम्ही असा अर्थ कढू शकत नाही, की 'बाहुबली'ला मारणारा व्यक्ती कटप्पाच आहे?'
'बाहुबली' सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये 'कटप्पा' म्हणतो, 'शस्त्रापेक्षाही घातक असतो तो विश्वासघात. तो विश्वासघात करणारा मीच आहे.'
यावर लेखकाने आणखी प्रश्न निर्माण केला आहे. लेखकाने सांगितले, 'विश्वासघात करणारा कटप्पा आहे, तरी बाहुबलीला मारणारा कटप्पा असेलच असे कशावरून.' आता लेखकाने असा प्रश्न केल्यानंतर 'कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्नावर आणखी एक कोड निर्माण झाले आहे.

मागील दिवसांत दिग्दर्शकाने सांगितले होते, की सिनेमा लोकांनी विसरू नये म्हणून आम्हाला त्याचा शेवट दुस-या भागात दाखवायचा होता. लोक बाहुबलीला कसे आणि कुणी मारले हे पाहण्यासाठी नक्कीचा थिएटर्समध्ये येतील. आम्हाला लोकांनी उत्सूकता ताणून धरायची होती. मला 'बाहुबली'चा दुसरा भाग बनवण्यासाठी एक वर्षांचा कालावधी मिळाला आहे. लोकांना दुस-या भागाची प्रतिक्षा आहे, हे आम्हाला माहित आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'बाहुबली' सिनेमाचे ऑन-लोकेशनचे PHOTOS...