आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चिनी कम\'मधील बिग बींची ही चिमुकली फ्रेंड आता खरंच दिसतेय \'सेक्सी\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - 'चिनी कम'मधील एका दृश्यात बिग बींसोबत स्विनी, उजवीकडे - स्विनीचे लेटेस्ट छायाचित्र - Divya Marathi
डावीकडे - 'चिनी कम'मधील एका दृश्यात बिग बींसोबत स्विनी, उजवीकडे - स्विनीचे लेटेस्ट छायाचित्र

बॉलिवूड सिनेमांमध्ये मोठ्या स्टार्ससोबतच बालकलाकारांनाही अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक सिनेमे तर बालकलाकारांच्या बळावरच हिट होत असतात. येथे अनेक बालकलाकार आता मोठे झाले असून सिल्व्हर स्क्रिनवर लीड हीरो आणि हिरोईनच्या रुपात एन्ट्री घेत आहेत. बालपणी क्यूट दिसणारे हे बालकलाकार मोठे झाल्यानंतर मात्र ग्लॅमरस दिसू लागतात. अशाच एका बालकलाकाराविषयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 'चिनी कम' या सिनेमातील बिग बींची ती चिमुरडी मैत्रीण तुम्हाला आठवतच असेल ना. या सिनेमात एका चिमुरडीने साकारलेली ब्लड कॅन्सरची रुग्ण असलेली बुद्धाची लहानशी मैत्रीण 'सेक्सी' ही व्यक्तिरेखा लक्षणीय ठरली होती. ही भूमिका वठवली होती स्विनी खराने. 2007 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाच्यावेळी स्विनी केवळ नऊ वर्षांची होती. आता ती 17 वर्षांची झाली असून तिचा लूकसुद्धा ग्लॅमरस झाला आहे.
12 जुलै 1998 रोजी जन्मलेल्या स्विनीने बालकलाकाराच्या रुपात छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अभिनय केला आहे. 'बा बहू और बेबी' या सिनेमातील तिने साकारलेली चैताली ही भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर ती 'परिणीता', 'एलान', 'सियासत', 'चिंगारी', 'हॅरी पुत्तर', 'पाठशाला' या सिनेमांमध्ये बालकलाकाराच्या रुपात झळकली आहे. 'चिनी कम' या सिनेमात तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. स्विनी केवळ हिंदीतच नव्हे तर हॉलिवूडमध्येही कार्यरत आहे. 2005 मध्ये 'आफ्टर द वेडिंग' या हॉलिवूड सिनेमात ती झळकली होती.
स्विनी आता मुंबईतील विले पार्लेस्थित नर्सी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे कॉमर्स या विषयाचे शिक्षण घेत आहे. स्विनी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव असून इंस्टाग्रामवर तिची बरीचशी ग्लॅमरस रुपातील छायाचित्रे बघायला मिळतात.
एकंदरीतच स्विनीची ही छायाचित्रे बघता बिग बींची ही सेक्सी फ्रेंड आता रिअल लाईफमध्येही सेक्सी दिसतेय, असंच म्हणायला हवं.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्विनीचा लक्ष वेधून घेणारा ग्लॅमरस अंदाज...
बातम्या आणखी आहेत...