Home »Gossip» Yesteryear Bollywood Divas Like Jayaprada, Rakhi, Sadhana And Many More Then And Now

Then And Now: आजही स्टनिंग दिसतात जयाप्रदा, पाहा Top अॅक्ट्रेसेच्या लूकमध्ये झालेला बदल

दिव्य मराठी वेब टीम | Dec 04, 2017, 15:57 PM IST

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणातील सशक्त स्त्री म्हणून ओळखल्या जाणा-या जयाप्रदा वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरसुद्धा पूर्वी इतक्याच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसतात. अलीकडेच हैदराबाद येथे रामोजी फिल्म सिटी येथे झालेल्या तिस-या इंडीवूड फिल्म कार्निव्हलला हजेरी लावली होती. या सोहळ्यात जयाप्रदाला आयकॉन ऑफ इंडियन सिनेमा या पुरस्काराने गौरविण्यात आले. ब-याच दिवसांनी मीडियासमोर आलेल्या जयाप्रदा यावेळी पुर्वी इतक्याच सुंदर दिसल्या. साडीत त्यांचे रुप आणखीने खुलून दिसले. भविष्यात चित्रपटसृष्टीत कार्यरत राहणार असल्याचे जयाप्रदा यांनी यावेळी सांगितले. 2013 मध्ये आलेल्या रज्जो या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. सध्या त्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अॅक्टिव असून 'सुवर्णा सुंदरी' हे त्यांच्या आगामी दाक्षिणात्य चित्रपटाचे नाव आहे.

बॉलिवूडच्या जुन्या काळाबद्दल बोलायचे झाल्यास जयाप्रदा यांच्या नावाचा उल्लेख सहज निघतो. ऐंशीच्या दशकात त्यांची फॅन फॉलोईंग प्रचंड मोठी होती. त्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे सिल्व्हर स्क्रिनवर राज्य केले.


जयाप्रदा यांच्या लूकवर वाढत्या वयाचा परिणाम झाला नसला, तरी त्यांच्या समकालीन ब-याच अभिनेत्री आता म्हाता-या दिसू लागल्या आहेत. तर काहींनी अगदी जयाप्रदा यांच्याप्रमाणेच आपला चार्म आजही कायम ठेवला आहे. आपल्या काळात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत गणल्या जाणा-या शर्मिला टागोर, माला सिन्हा, तनुजा, बबिता, वैजयंती माला, मौसमी चॅटर्जी, हेलन, अनीता राज यांसह अनेक अभिनेत्रींनी आता वयाची पन्नाशी, साठी ओलांडली आहे. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यात बराच बदल झालेला दिसून येतोय.


आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री आता कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. गतकाळातील अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended