आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Then And Now : पाहा किती बदलला बॉलिवूडच्या \'शर्मिली\'सह या 28 अॅक्ट्रेसेसचा लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री राखी, पूर्वी आणि आत्ता - Divya Marathi
अभिनेत्री राखी, पूर्वी आणि आत्ता
एन्टरटेन्मेंट डेस्कः प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची पत्नी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राखी यांनी अलीकडेच अनेक वर्षानंतर एखाद्या अवॉर्ड नाइटला हजेरी लावली होती. मुंबईत नुकत्याच झालेल्या 54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव पुरस्काराला त्यांनी हजेरी लावली होती. राखी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून संन्यास घेतला आहे. त्या 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'क्लासमेट' या सिनेमात शेवटच्या झळकल्या होत्या. तेव्हापासून पब्लिक इव्हेंट्समध्येही त्या फार कमी दिसल्या. आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणा-या राखी या अवॉर्ड सोहळ्यात गुलाबी साडीतील दिसल्या. आता वाढत्या वयानुसार त्यांच्या चेह-यात बराच बदल झाला आहे. पण तरीदेखील त्यांचा पूर्वीचा चार्म कायम आहे. संपूर्ण कार्यक्रमात राखी या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. राखी आता मुंबईपासून दूर पनवेल येथे राहतात.     

आपल्या काळात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत गणल्या जाणा-या अभिनेत्रींमध्ये राखी यांच्यासोबतच शर्मिला टागोर, माला सिन्हा, तनुजा, बबिता, वैजयंती माला, मौसमी चॅटर्जी, हेलन, अनीता राज यांसह अनेक अभिनेत्रींनी आता वयाची पन्नाशी, साठी ओलांडली आहे. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यात बराच बदल झालेला दिसून येतोय. या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे सिल्व्हर स्क्रिनवर राज्य केले. मात्र जुन्या काळातील या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री आता कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. गतकाळातील अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...