आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणाने किशोर कुमार यांना घटस्फोट देऊन या अभिनेत्रीने केले दुसरे लग्न, आई होती विरोधात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गतकाळातील अभिनेत्री योगिता बाली आज त्यांचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 ऑगस्ट रोजी मुंबईत जन्मलेल्या योगिता बाली यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले पण मागील 28 वर्षापासून योगिता चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट 'आखिरी बदला' 1989 मध्ये रिलीज झाला होता. योगिता यांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमारसोबत लग्न केले होते. पण त्यांचे लग्न केवळ 2 वर्षे टीकले. किशोर कुमार यांच्यासोबत लग्न होऊ नये अशी योगिता यांच्या आईची इच्छा होती. पण आईच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले होते. अखेर योगिता यांचे किशोर कुमार यांच्याबरोबर नाते संपुष्टात आले आणि त्यांनी मिथून चक्रवर्तीसोबत लग्न केले. अमिताभ बच्चनसोबत केला होता डे्ब्यू...
 
जास्तीत जास्त चित्रपटात केली  सहकलाकाराचे काम..
योगिता यांनी 1971 साली 'परवाना' चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नवीन निश्चल मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात अमिताभ यांनी नकारात्मक भूमिका केली होती. योगिता यांनी अनेक चित्रपटात काम केले पण त्यांनी सहकलाकार म्हणून जास्त भूमिका केल्या.
 
 
या चित्रपटांत केल्या आहे भूमिका..
योगिता बाली यांनी 'जमीन आसमान' (1972), 'नफरत' (1973), 'एक मुठ्ठी आसमान' (1973), 'चौकीदार' (1974), 'अपराध' (1974), 'अजनबी' (1974), 'जिंदगी और तूफान' (1975), 'नागिन' (1976), 'महबूबा' (1976), 'धूप छांव' (1977), 'चाचा भतीजा' (1977), 'कर्मयोगी' (1978), 'सलाम मैमसाहब' (1979), 'जानी दुश्मन' (1979), 'आखिरी कसम' (1979), 'उन्नीस बीस' (1980), 'ओह बेवफा' (1980), 'जमाने को दिखाना है' (1981), 'कराटे' (1983), 'वक्त की पुकार' (1984), 'राज तिलक' (1984), 'लैला' (1984), 'ये इश्क नहीं आसान' (1984), 'मेरा कर्म मेरा धर्म' (1987), 'आखिरी बदला' (1989) यांसारख्या चित्रबपटात काम केले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या. योगिता बाली यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...