आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेजल नव्हे युवराजचे पहिले प्रेम, या 6 अभिनेत्रींसोबत लगावला होता लव्ह अफेअर्सचा \'सिक्सर\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे (वरुन) प्रीती झिंटा, मिनिषा लांबा, नेहा धूपिया, मध्यभागी युवराज सिंह, उजवीकडे (वरुन) किम शर्मा, दीपिका पदुकोण, रिया सेन - Divya Marathi
डावीकडे (वरुन) प्रीती झिंटा, मिनिषा लांबा, नेहा धूपिया, मध्यभागी युवराज सिंह, उजवीकडे (वरुन) किम शर्मा, दीपिका पदुकोण, रिया सेन

एन्टरटेन्मेंट डेस्क : सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या नंतर आता क्रिकेटपटू युवराज सिंग बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. बातम्यांनुसार, ब्रिटिश वंशाची बॉलिवूड अभिनेत्री हेजल किचची निवड युवराजने आपल्या जोडीदाराच्या रुपात केली आहे. अद्याप लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा लग्नसोहळा पार पडण्याची शक्यता आहे. अलीकडेच हरभजन सिंगच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये हे लव्ह बर्ड्स एकत्र पोहोचले होते. या महिन्यात युवराज-हेजलचा रोका सेरेमनी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
कोण आहे हेजल?
हेजल किच वयाच्या 18 व्या वर्षी भारतात आली होती. येथे सुटी घालवण्याच्या निमित्ताने ती आली होती. मात्र अतिशय देखण्या हेजलला येथे मॉडेलिंग आणि अॅक्टिंगच्या ऑफर्स मिळाल्या. त्यानतंर तिने भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हेजलने यापूर्वी 'हॅरी पॉटर' सीरिजच्या सिनेमांमध्ये एक्स्ट्रा अॅक्टर म्हणून काम केले आहे. बॉलिवूडमध्ये 'आ आंते अमलापुरम' या गाजलेल्या आयटम नंबरमध्ये तिने आपला डान्स जलवा दाखवला आहे. याशिवाय सलमान खान आणि करीना कपूर स्टारर 'बॉडीगार्ड'मध्येही ती झळकली आहे. याशिवाय 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वातही ती दिसली होती. मात्र कमी वोट्स मिळाल्याने पहिल्याच आठवड्यात ती शोमधून बाहेर पडली होती.
हेजल हे युवीचे पहिले प्रेम असे जर का तुम्हाला वाटत असेल तर तसे मुळीच नाहीये. यापूर्वी त्याचे नाव दीपिका पदुकोण, प्रीती झिंटासह अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. त्याच्या लव्ह अफेअर्सची लिस्ट बरीच मोठी आहे. मैदानावर सिक्सर लगावणा-या युवीने लव्ह अफेअर्सचेही सिक्सर लगावले आहेत. या खास पॅकेजमधून divyamarathi.com तुम्हाला युवराजच्या फेमस लिंकअप्सविषयी सांगत आहे....
किम शर्मा
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंह यांच्या अफेअरची सर्वाधिक चर्चा होती. मोहब्बते फेम किम आणि युवराजचं रिलेशन जवळजवळ चार वर्षे सुरु होते. पण ही प्रेमकहाणी अधुरी राहिली आणि 2007 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर बिझनेसमन अली पंजनीसोबत किमने लग्न केले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या युवराजच्या इतर अफेअर्सविषयी...