आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विना Makeup अशी दिसते सलमानची ऑनस्क्रिन 'Wife', लवकरच होणारेय क्रिकेटरसोबत लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अभिनेत्री हेजल कीच हिने सलमान खानच्या गाजलेल्या 'बॉडीगार्ड' या सिनेमात त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या सिनेमाव्यतिरिक्त ती 'मॅक्सिम' या सिनेमातील 'आ आंटे अमलापूरम..' या आयटम नंबरद्वारे प्रसिद्धीझोतात आली. काही सिनेमे आणि 'बिग बॉस 7' मध्ये झळकल्यानंतर आता हेजलने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला आहे. सध्या हेजल तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी चढणारेय बोहल्यावर..

हेजल कीच प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकणारेय. येत्या 30 नोव्हेंबर रोजी दोघांचा विवाहसोहळा पार पडणारेय. चंडीगडमध्ये होणा-या या विवाहसोहळ्याला हेजल आणि युवराजचे फॅमिली मेंबर्स उपस्थित राहणार आहेत. हिंदू आणि पंजाबी पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा पार पडणारेय. दोघांच्या लग्नाचे फंक्शन्स चंडीगड, गोवा आणि दिल्लीत होणार आहेत.

सोशल मीडियावरुन झाली मैत्री
हेजल आणि युवराज यांची मैत्री सोशल मीडियावर झाली होती. नंतर एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. मात्र ही भेट व्हायला एक वर्ष उजाडले. काही काळ सोबत घालवल्यानंतर युवराजने हेजलला प्रपोज केले. हेजलने युवराजला लग्नासाठी तिचा होकार कळवल्यानंतर युवराजने हेजलच्या पालकांची भेट घेऊन या नात्यासाठी परवानगी मागितली.

विदाऊट मेकअप स्टनिंग दिसते हेजल
सोशल मीडियावर सेलिब्रिटी त्यांचे ग्लॅमरस फोटोज शेअर करत असतात. हेजल मात्र तिच्या ग्लॅमरस फोटोजसोबत विदाऊट मेकअप फोटोसुद्धा शेअर करत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने असे अनेक फोटोज पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती नो-ग्लॅमरस आणि नो-मेकअप लूकमध्येही स्टनिंग दिसतेय.

Without Makeup कशी दिसते हेजल, पुढील स्लाईड्सवर बघा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...