आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉट अभिनेत्रीने सलमान खानसोबत केले होते डेब्यू, मात्र आज आहे अज्ञातवासात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री जरीन खान)

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानने आज वयाची 28 वर्षे पूर्ण केली आहेत. 14 मे 1987 रोजी मुंबईत जन्मलेल्या जरीनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली. 2009 मध्ये जरीनने 'वीर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. पहिल्याच सिनेमात तिला सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर 2011 मध्ये 'रेडी' या सिनेमात तिला आयटम नंबर करण्याची संधी मिळाली. या आयटम साँगमध्ये सलमान खानच तिच्यासोबत थिरकला होता.
2012 मध्ये आलेल्या 'हाऊसफूल 2' मध्ये जरीन झळकली होती. हा सिनेमा हिटसुद्धा ठरला. मात्र मल्टिस्टारर सिनेमाला मिळालेल्या यशाचे श्रेय जरीनला मिळाले नाही. सध्या ती रेमो डिसुजांच्या आगामी 'अमर मस्ट डाय' या थ्रिलर सिनेमावर काम करत असून यामध्ये राजीव खंडेलवाल तिच्या अपोझिट आहे. हा 'क्रँक' या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. या सिनेमाव्यतिरिक्त अद्याप जरीनच्या हातात मोठ्या बॅनरचा एकही सिनेमा नाहीये.
खरं तर जरीनला कतरिनाची कॉपी म्हटले जाते. मात्र बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कतरिनासारख्या लूक्सचा फायदा तिला मुळीच झाला नाही. अजूनही जरीन बॉलिवूडमध्ये एका मोठ्या संधीच्या शोधात आहे. बॉलिवूडमध्ये फासरे यश न मिळू शकल्याने जरीनने आपला मोर्चा तामिळ आणि पंजाबी सिनेमांकडे वळवला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जरीन खानच्या ग्लॅमरस अदा..