आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केट विन्सलेटच्या \'टायटॅनिक\'मध्ये झाले आहेत 15 मोठे Blunders, पहिल्या नजरेत येणार नाही लक्षात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'टायटॅनिक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेट हिने नुकतीच वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. 1994 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या केटच्या करिअरमधील 'टायटॅनिक' हा एक सुपरहिट सिनेमा आहे. 'टायटॅनिक' जहाजावर आधारित हा सिनेमा 1 नोव्हेंबर 1997 रोजी रिलीज झाला होता. जहाजबुडीच्या सत्यघटनेवर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या सिनेमाचा निर्मिती खर्च 1205 कोटी इतका होता, तर सिनेमाने 14 हजार कोटींचा बिझनेस केला होता. जेम्स कॅमरुन दिग्दर्शित या सिनेमात टायटॅनिक जहाज बुडण्याची घटना चित्रीत करण्यात आली होती.
या सिनेमाचे शुटिंग एखाद्या महासागरात नव्हे तर तीन फूट पाण्यात करण्यात आले होते. स्पेशल इफेक्ट्स आणि कॅमे-याच्या जादूगरीने सिनेमात जीव ओतला होता. हा सिनेमा जेम्स यांच्या करिअरमधील उत्कृष्ट सिनेमा सिद्ध झाला. एकीकडे सिनेमा जबरदस्त बिझनेस केला, तर दुसरीकडे अनेक अवॉर्ड्ससुद्धा सिनेमाने आपल्या नावी केले.
सिनेमात सर्वकाही ठिक होते, मात्र या सिनेमात दोनशेहून अधिक चुका होत्या, हे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? या सिनेमात झालेल्या चुकांमधून निवडक 15 चुका आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगणार आहोत. सिनेमा पाहताना नक्कीच या चुका तुमच्या निदर्शनास आल्या नसाव्यात.
वरील छायाचित्रात स्पष्ट दिसतंय, की 'टायटॅनिक'च्या ज्या दृश्यात हीरो-हिरोईन हात लांब करुन उभे असतात, ते दोन वेगवेगळे शॉट्स आहेत. तेथे असलेल्या ग्रिलमधील अंतरावरुन हे स्पष्ट होतं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणत्या 15 चुका सिनेमात आढळून आल्या...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...