आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Rare Photos: 1967 मध्ये अशा पद्धतीने झाले होते तरुणींचे सिनेमांसाठी ऑडीशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसः वरील छायाचित्र हे 1967 मधील असून जेम्स बॉण्ड सिनेमाच्या ऑडीशनचे आहे. यामध्ये दिग्दर्शक पीटर आर हंट अभिनेता जॉन रिचर्डसन आणि एका अभिनेत्रीची लव सीनची टेस्ट घेताना दिसत आहेत. हा फोटो लाइफ या प्रसिद्ध मॅगझिनचे फोटोग्राफर लूमिस डीन यांनी त्यांच्या कॅमे-यात क्लिक केला होता. लाइफ या मॅगझिनने डीन यांना जेम्स बॉण्ड सीरीजचा सिनेमा 'ऑन हर मिस्ट्रीज सीक्रेट सर्विस'च्या कास्टिंग सेशनसाठी पाठवले होते. ही छायाचित्र लाइफ मॅगझिनने एका बॉण्डवर आधारित आर्टिकलसोबत प्रकाशित केली होती. हे आहेत या फिल्मचे स्टार्स आणि काहीशी अशी आहे कहाणी...
'ऑन हर मिस्ट्रीज सीक्रेट सर्विस' जेम्स बॉण्ड सीरीजचा सहावा गुप्तेहरावर आधारित सिनेमा होता. यामध्ये इसमें जॉर्ज लॅजेंबी (जेम्स बॉण्डच्या भूमिकेत), डायना रिग, टेली सॅवलास आणि बर्नार्ड ली यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 18 डिसेंबर 1969 रोजी रिलीज झालेला या सिनेमाची कहाणी पोर्तुगालमध्ये सुरु होते. येथे बीचवर आत्महत्या करायला गेलेल्या एका महिलेचे जेम्स बॉण्ड प्राण वाचवतो. त्यानंतर त्याच महिलेसोबत एका कॅसिनोत त्याची भेट होते.
ट्रेसी नावाची ही महिला जेम्स बॉण्डला धन्यवाद देण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावते. मात्र जेम्सची जशी एन्ट्री होते, तसा एक अज्ञात व्यक्ती त्याच्यावर हल्ला करतो. मात्र हॉटेलच्या रुममध्ये अटॅकर लपला असल्याचे माहित नसल्याचा दावा ती महिला करते. पुढच्या दोन दिवसांनी काही लोक जेम्स बॉण्डचे अपहरण करतात. त्यानंतर बॉण्डची भेट युरोपिअन क्राइम सिंडिकेट यूनियन कोर्सच्या प्रमुखासोबत घालून दिली होती. तो त्याला त्याचा भूतकाळ सांगताना ट्रेसी त्याची एकुलती एक मुलगी असल्याचे सांगतो. जेम्स बॉण्डने ट्रेसीसोबत लग्न करावे अशी त्याची इच्छा असते. मात्र बॉण्ड त्याला नकार देतो. कहाणीत पुढे अनेक रंजक वळण येतात.

54 वर्षांत बॉण्ड सीरीजचे 26 सिनेमे
जेम्स बॉण्ड सीरीजचा पहिला सिनेमा 1962 मध्ये 'डॉ. नो' नावाने आळा होता. या सिनेमात कॉनेरीने जेम्स बॉण्डची भूमिका साकारली होती. 54 वर्षांत या सीरीजचे एकुण 26 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 2015 मध्ये आलेला 'स्पेक्टर' या सीरीजचा शेवटचा सिनेमा होता. यामध्ये डॅनियल कॅगने जेम्स बॉण्डची भूमिका साकारली होती. आत्तापर्यंत सहा अभिनेत्यांनी जेम्स बॉण्डची भूमिका साकारली आहे. जॉर्ज लॅजेंबी, टिमोथी डेल्टन, पियर्स ब्रॉसनन, डेनियल क्रॅग , रोगर मूरे आणि सीन कॉनेरी ही या सहा अभिनेत्यांची नावे आहेत.
डीन यांनी त्यांच्या कॅमे-यात क्लिक केलेले ऑडीशनचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

सर्व फोटोज : साभार LIFE

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...