आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 58th Grammy Awards: Indian Origin Artistes Anoushka Shankar, Asif Kapadia Nominated

58th Grammy Awards: भारतीय वंशाच्या अनुष्का शंकर, असिफ कपाडियाला नामांकन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसः प्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर आणि 'अॅमी' या डॉक्यमेंट्रीचे दिग्दर्शक असिफ कपाडिया यांना 58व्या ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळ्यात नामांकन प्राप्त झाले आहे. सोमवारी या नामांकनांची घोषणा करण्यात आली. भारतीय वंशाची 34 वर्षीय अनुष्का शंकर हिला बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्बम श्रेणीत नामांकन मिळाले असून 'होम' या सोलो अल्बमसाठी तिची निवड झाली आहे.
नामांकनाविषयीचा आनंद व्यक्त करताना अनुष्काने सोशल नेटवर्किंग साइटवर फेसबुकवर लिहिले, "पाचव्यांदा मला ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळाले आहे. 'होम' या ट्रेडिशनल अल्बममुळे मला पुन्हा एकदा ही संधी मिळाली. मी माझे वडील आणि गुरु यांचे आभार मानते."
'होम' या अल्बममध्ये दोन राग असून एकाची निर्मिती अनुष्काचे दिवंगत वडील आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक रवी शंकर यांची आहे. याच श्रेणीत अनुष्काला पाचव्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे.
इंडो-ब्रिटीश दिग्दर्शक असिफ कपाडिया यांना बेस्ट म्युझिक फिल्म श्रेणीत नामांकन प्राप्त झाले आहे. 'अॅमी' ही डॉक्युमेंट्री ब्रिटीश गायिका अॅमी वाइनहाउसच्या जीवनावर आधारित आहे. पुढील वर्षी 15 फेब्रुवारी रोजी 58 व्या ग्रॅमी अवॉर्ड्सचे वितरण होणारेय.
ग्रॅमी अवॉर्ड्सची निवडक नामांकने पुढीलप्रमाणे...
अल्बम ऑफ द इयर - अल्बामा शेक यांचे 'साउंड अँड कलर', केंड्रीक लामर यांचे 'टू पिंप अ बटरफ्लाय', टेलर स्विफ्टचे 'ट्रॅव्हलर'
साँग ऑफ द इयर - 'ऑलराइट', 'ब्लॅक स्पेस', 'गर्ल क्रश', 'सी यू अगेन', 'थिंकिंग आउट लाउड'
बेस्ट न्यू आर्टिस्ट - कर्टनी बारनेट, जेम्स बे, सॅम हंट, टोरी केली, मेगन ट्रेनर
बातम्या आणखी आहेत...