आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात दारुचा ग्लास घेऊन ऑस्करमध्ये पोहोचली ही अॅक्ट्रेस, स्वतःवर ठेऊ शकली नाही ताबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्यात नवीन गोष्टी बघायला मिळाल्या.  आता अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सचे उदाहरण घ्या. ही अभिनेत्री चक्क दारुचा ग्लास हातात घेऊन अवॉर्डस्थळी दाखल झाली. अशा अवस्थेत रेड कार्पेटवर एन्ट्री करताच उपस्थितांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. अनेक जण तिला या अवस्थेत बघून अचंबित झाले. तर काहींना मात्र तिला बघून हसू अनावर झाले. यावेळी जेनिफर मस्तीच्या मूडमध्ये दिसली. 


सीट शोधण्यासाठी करत होती धडपड... 
जेनिफर लॉरेन्स मद्यधूंद अवस्थेत होती. तिने एवढी दारु प्यायली होती, की तिला स्वतःची जागा शोधण्यास बरीच धडपड करावी लागली. परिधान केलेला गाऊन उचलून ती एका खुर्चीच्या मधून स्वतःच्या सीटवर पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसली. या अवॉर्ड सोहळ्यात  जेनिफर प्लेटिनम सीक्वेंस डियोर गाऊनमध्ये दिसली. सोबत तिने स्ट्रेपी हिल्स पायात घातल्या होत्या. यंदाच्या अवॉर्ड सोहळ्यात जेनिफरला नामांकन मिळाले नव्हते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, जेनिफरचे अवॉर्ड सोहळ्यातील काही फोटोज.... 

बातम्या आणखी आहेत...