आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर: ओल्डमॅन बेस्ट अॅक्टर, फ्रांसेस मॅकडोरमंड बेस्ट अॅक्ट्रेस, शशी कपूर-श्रीदेवी यांना श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅरी ओल्डमॅन याने डार्केस्ट अवरमध्ये ब्रिटीश पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांची भूमिका केली होती. - Divya Marathi
गॅरी ओल्डमॅन याने डार्केस्ट अवरमध्ये ब्रिटीश पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांची भूमिका केली होती.

लॉस अँजलिस  - 90व्या अकादमी अवॉर्ड अर्थात ऑस्कर सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठेचा हा पुरस्कार सोहळा मानला जातो. ऑस्करच्या शर्यतीत 'द शेप ऑफ वॉटर' ही फिल्म अव्वल ठरली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार द शेफ ऑफ वॉटरला मिळाला आहे. या फिल्मला सर्वाधिक 13 नामांकने मिळाली होती. त्या खालोखाल 'मडबाऊंड'ला 5 विभागात तर 'गेट आऊट'ला 4 नामांकने मिळाली. ओल्डमॅन बेस्ट अॅक्टर आणि फ्रांसेस मॅकडोरमंड बेस्ट अॅक्ट्रेस ठरले आहे.  ऑस्कर सोहळ्यात बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते शशी कपूर, आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. 

 

शशी कपूर-श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा 
- ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यात शशी कपूर आणि श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. दोन्ही कलाकारांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. 
- शशी कपूर यांनी हॉलिवूडमधील द हाऊसहोल्डर, शेक्सपीयर वल्लाह, द गुरु, बॉम्बे टॉकिज आणि इन कस्टडी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. 
- संगीतकार एडी वेडर यांनी जगाचा निरोप घेतलेल्या या भारतीय कलाकारांना श्रद्धांजली वाहिली. 

 

ऑस्कर गोज टू...
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पुरस्कार सॅम रॉकवेल याने जिंकला आहे. 'थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड इंबिंग'साठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.

- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार अॅलिसन जॉने हिने पटकावला आहे. आय, टॉन्या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला. 

- सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार चिली भाषेतील 'अ फँटॅस्टिक वुमन' चित्रपटाला मिळाला. 
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशनचा पुरस्कार 'द शेप ऑफ वॉटर'ला मिळाला आहे.
- सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन या दोन पुरस्कारांवर 'डंकर्क' चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. 
- सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा (डॉक्युमेंट्री फिचर) पुरस्कार 'इकरस' ला मिळाला आहे. 
- सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठीचा पुरस्कार 'फॅन्टम थ्रेड' ला मिळाला आहे. 
- सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा पुरस्कार 'डार्केस्ट अवर'ला मिळाला आहे. 

 

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन 
कॉल मी बाय यूवर नेम 
डार्केस्ट अवर
डंकर्क
गेट आऊट 
लेडी बर्ड 
फँटम थ्रेड 
द पोस्ट 
द शेप ऑफ वॉटर
थ्री बिलबोर्ड्स आऊटसाइड इबिंग, मेसुरी

 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

ख्रिस्तोफर नोलान (डंकर्क)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)
गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

 

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
मार्गो रॉबी (आय टोन्या)
साईरसे रोणान (लेडी बर्ड)
मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)
गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)
डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

बातम्या आणखी आहेत...