आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oscar Awards : अशी आहे रेड कार्पेटची कथा, जाणुन घ्या कधी झाली सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ लॉस एंजिलिस: सोमवारी ज्यावेळी लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये रेड कार्पेट असलेल्या हॉलचा पडदा उघडेल, तेव्हा हॉलिवूड इतिहासच नाही तर सिनेप्रेमींसाठी खुप काही असेल. 90 व्या ऑस्कर अवॉर्डविषयी आम्ही बोलत आहोत. यासाठी रेड कार्पेट सजवून तयार आहे. ऑस्कर अवॉर्ड एक असा मंच असतो. जिथे जगभरातील सेलिब्रिटी वेगवेगळ्या आणि नामांकित डिझानयरचे ड्रेस घालून रेड कार्पेटवर वॉक करतात. हॉलिवूडमध्ये रेड कार्पेटची सुरुवात 33 व्या ऑस्करने झाली होते. कार्पेट सजवण्यासाठी 16500 वर्गफूटाचा एरिया...
ऑस्कर रेड कार्पेट जगातील सर्वात ग्लॅमरस 'फॅशन परेड' म्हटले जाते. कार्पेट सजवण्यासाठी 16500 वर्ग फूड एरियाची गरज असते. हे सजवण्यासाठी जवळपास 60 हजार फूलांची गरज असते. इथे सात फुट उंचीच्या ऑस्करच्या मूर्त्या ठेवल्या जातात. यावर कार्यक्रमाच्यापुर्वी सोन्याचा थर चढवला जातो.


रेड कार्पेटचा इतिहास
- रेड कार्पेटची सुरुवात मुळतः इ.स. पूर्व 458 ची आहे असे मानले जाते. ट्रोजन वॉल(युध्द) नंतर सैनिक जेव्हा आपल्या घरी परतत होते तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरत होत्या.
- खास पाहूणे आणि दिग्गज व्यक्तींसाठीही रेड कार्पेट अंथरण्याची पध्दत आहे. 1821 मध्ये साउथ कॅरोलिनाचे जॉर्जटाउनमध्ये राष्ट्रपती जेम्स मोनरोच्या सन्मानासाठी पहिल्यांदा रेड कार्पेट अंथरण्यात आले होते.
- 1902 मध्ये न्यूयॉर्क ते शिकागोच्यामध्ये लक्जरी ट्रेनची सुरुवात झाली. या काळात दोन्हीही स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर टाइल्स  खराब होऊ नये म्हणून रेड कार्पेट अंथरण्यात आले.
- हॉलिवूडमध्ये रेड कार्पेटची सुरुवात 1922 मध्ये इजिप्शियन थिएटरमध्ये झाली. यामध्ये अमेरिकन अॅक्टर डगलस फेयरबँक्स अभिनीत फिल्म रॉबिनहुडचे प्रीमियर झाले. या थिएटरचे कामल सिड ग्रॉमॅनला रेड कार्पेटचे क्रेडिट मिळाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऑक्सर अवॉड्समधील रेड कार्पेटचे काही फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...