आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oscar पुरस्कार सोहळ्यात श्रीदेवी आणि शशी कपूर यांना श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या 90 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेमोरियम सेगमेंटमध्ये या दोन भारतीय कलाकारांना स्थान देण्यात आले. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 90 वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. ऑस्करमध्ये ‘मेमोरियम सेगमेंट’ असतो. यात वर्षभरात निधन झालेल्या सिनेसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. जगभरात सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्यांना मानवंदना देण्याचा हा एक प्रयत्न असतो. 


यंदा मेमोरियम सेगमेंटमध्ये एडी वेडर यांनी रुम अॅट द टॉप हे गाणे सादर केले. या गाण्याद्वारे दिग्गजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात स्क्रीनवर श्रीदेवी आणि शशी कपूर यांचे नाव येताच तमाम भारतीय प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
 
वयाच्या 54 व्या वर्षी जग सोडून गेल्या श्रीदेवी 
श्रीदेवी यांचे यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईत निधन झाले. बाथटबमधील पाण्यात बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. श्रीदेवी यांची ही एक्झिट चित्रपटप्रेमींसाठी धक्काच होती. गेली पाच दशके श्रीदेवी यांनी तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच प्रमुख सिनेसृष्टींमध्ये आपला दबदबा निर्माण केला. त्यांनी जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले होते.  


वयाच्या 79 व्या वर्षी झाले होते शशी कपूर यांचे निधन... 
शशी कपूर यांचे गेल्यावर्षी 4 डिसेंबर रोजी निधन झाले होते. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. 116 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते, त्यापैकी 61 चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 

बातम्या आणखी आहेत...