आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2017-2018 मध्ये श्रीदेवीसह या मोठ्या स्टार्सचे झाले निधन, ऑस्करमध्ये वाहिली श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिसः 90 वा ऑस्कर अवॉर्ड सोहळा सोमवारी लॉस एंजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. सेरेमनीत एकीकडे कलाकारांचे सादरीकरण आणि पुरस्कार वितरण झाले, तर दुसरीकडे  2017 आणि 2018 यावर्षात जगाचा निरोप घेतलेल्या कलाकारांचे स्मरण करुन त्यांना मानवंदना देण्यात आली. ऑस्करमध्ये ‘मेमोरियम सेगमेंट’ असतो. यात वर्षभरात निधन झालेल्या सिनेसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. जगभरात सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्यांना मानवंदना देण्याचा हा एक प्रयत्न असतो. 

 

यंदा मेमोरियम सेगमेंटमध्ये एडी वेडर यांनी रुम अॅट द टॉप हे गाणे सादर केले. या गाण्याद्वारे दिग्गजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यात स्क्रीनवर श्रीदेवी आणि शशी कपूर यांचे नाव येताच तमाम भारतीय प्रेक्षकांचे डोळे पाणावले. यावर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवी यांचे निधन झाले तर मागील वर्षी 4 डिसेंबरला शशी कपूर यांनी जगाला अलविदा केले. हॉलिवूडच्याही अनेक दिग्गज कलाकारांनी या जगातून कायमची एक्झिट घेतली.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यंदाच्या ऑस्करमध्ये कोणकोणत्या कलाकारांना मानवंदना देण्यात आली... 

बातम्या आणखी आहेत...