आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हॉलिवूड अॅक्ट्रेसने पाळीव कुत्र्याप्रमाणे ठेवले सिंहाला, एकाच बेडवर दोघे झोपतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांनाही विचारले की जंगलचा राजा कोण तर क्षणाचाही विलंब न लावता ते उत्तर देतात की सिंह. सिंह समोर आल्यानंतर चांगल्या-चांगल्या पैलवानांना घाम फुटतो. मात्र आज आम्ही तुम्हाला सिंहाचे असे रुप दाखवणार आहोत, जे पाहिल्यानंतर सिंह असाही राहू शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडेल. आतापर्यंत तुम्ही जंगलात फिरणारा, प्राणी संग्रहालयात जाळीमागे असला तरी एका डरकाळीने दहशत निर्माण करणारा सिंह पाहिला असेल. परंतू सिंह हा एखाद्या मुलीचा मित्र असू शकतो याचा तुम्ही कधी विचार केला का? हॉलिवूड अॅक्ट्रेस मेलानी ग्रिफिथ आणि तिचा मित्र अर्थात सिंह ज्याचे नाव नील आहे, हे दोघे कायम सोबत असतात. 

 

मेलानी आणि नीलची मैत्री सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारी आहे. मेलानी सिंहासोबत अशी राहाते आणि वागते जणू घरातील पाळीव कुत्रासोबत ती राहात आहे. सिंह आणि मेलानी सोबतच जेवता आणि एकाच बेडवर झोपतात देखील. 

 

सिंहासोबत बेड शेअर करते अॅक्ट्रेस 
- मेलानीच्या कुटुंबियांनी बऱ्याच वर्षांपूर्वी तिला अफ्रिकेचा एक सिंह भेट दिला होता. कुटुंबियांनी दिलेल्या अनोख्या भेटीने ती भारावून गेली होती. सिंह हा तिच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. जेव्हा कुटुंबियांनी खराखुरा सिंह तिच्या पुढ्यात आणून ठेवला तेव्हा तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 
- मेलानीने लहान बाळाप्रमाणे त्याला सांभाळले. त्याचे नाव नील ठेवले. त्याला एवढा लळा लावला की सिंहही माणसाळला. 
- मेलानी आणि नील यांच्यात एवढा आपलेपणा निर्माण झाला आहे की मेलानी आपल्या बेडवर सिंहाला घेऊन झोपते. ते सोबतच जेवण करतात. अंघोळ देखील सोबत करतात. नील आणि मेलानी एकाच स्विमिंग पुलमध्ये मस्ती करतात आणि रात्री एकाच बेडवर झोपतात. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेलानी आणि सिंहाची मस्ती... 

बातम्या आणखी आहेत...