Home | Hollywood | 10 banned foreign movies in india

बीभत्स दृश्ये, अश्लील भाषेमुळे या 10 विदेशी चित्रपटांवर लागला आहे भारतात BAN

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 24, 2018, 12:27 PM IST

देशात सध्या डेडपूलची धूम आहे. शिव्यांचा भडीमार आणि आपल्या पद्धतीने का

 • 10 banned foreign movies in india

  मुंबई - देशात सध्या डेडपूलची धूम आहे. शिव्यांचा भडीमार आणि आपल्या पद्धतीने काम करणाऱ्या या चित्रपटातील भुमिकेला त्याच्या भाषेमुळे भारतात ए सर्टीफिक्ट मिळाले आहे. चित्रपटात लीड रोल करणाऱ्या रायन रेनोल्डनसला अभिनेता रणवीर सिंहने हिंदीत आवाज दिला आहे. रणवीरने सांगितले की त्याला पडद्यावर शिव्या द्यायच्या होत्या त्याचमुळे त्याने या डबिंगला होकार दिला. पण तुम्हाला माहीत आहे का देशात 1978 पासून अनेक विदेशी चित्रपटांवर त्याची भाषा आणि अश्लीलतामुळे बॅन केले गेले आहे.

  1978 साली मीर जर्चीच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट ‘आई स्पिट ऑन योर ग्रेव’ला रिलीज करण्यास भारतने नकार दिला होता. केमिल केटोन स्टारर हा चित्रपट रेप आणि रिवेंज ड्रामा होता. चित्रपटातील काही सीन्सवर आपत्ती दर्शविली होती. 2010 साली याच चित्रपटाचा रिमेक बनवण्यात आला होता ज्याने चांगलीच कमाई केली होती.

  पुढच्या स्लाईडवर पाहा, भारतात बॅन झालेले विदेशी चित्रपट...

 • 10 banned foreign movies in india

  'ब्लु जास्मिन' चित्रपटाला भारतात न दाखवण्याचे कारण फक्त इगो होते. 2013 साली जेव्हा हा चित्रपट भारतात रिलीज केला जाणार होता तेव्हा सेंसर बोर्डाने सांगितले होते की चित्रपटात जिथेही धुम्रपान दाखविला जाणार आहे त्यावर डिस्क्लेमर दाखवले जाणार पण दिग्दर्शक वूडी एलनने याचा विरोध केला तर चित्रपट प्रदर्शनाला नकार देण्यात आला. 

 • 10 banned foreign movies in india

  रॉबर्ट डी-नीरो आणि जॅक एफ्रोंचा चित्रपट 'डर्टी ग्रँडपा'ला चित्रपटातील डायलॉग्ज आणि अश्लीलतेमुळे रिलीजची परवानही मिळाली नाही. सेन्सर बोर्डाने हा चित्रपट भारतीय दर्शकांसाठी योग्य नाही असे सांगितले.

 • 10 banned foreign movies in india

  तीन वर्षापूर्वी इतर देशात रिलीज झालेला सॅम टेलर यांचा इरोटीक ड्रामा ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’भारतीय सेन्सर बोर्डाला अनेक कारणांमुळे प्रदर्शनास अयोग्य वाटला. यामुळेच हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. 

 • 10 banned foreign movies in india

  2015 साली आलेला 'गेट हार्ड' हा कॉमेडी चित्रपट होता पण हा चित्रपट सेन्सर बोर्डापर्यंत पोहोचला नाही कारण त्याअगोदरच कळाले होते की यातील सीन्स भारतात कट केले जातील.

 • 10 banned foreign movies in india

  2011 साली आलेला चित्रपट ‘द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू’त्यातील काही अमानवीय दृश्यांमुळे भारतात रिलीदज करण्यात आला नाही. डॅनियल क्रेग स्टारर हा चित्रपट रिलीज झाला पण दिग्दर्शक डेविड फिन्चरने सीन्स हटविण्यास नकार दिला. 

 • 10 banned foreign movies in india

  द ह्यूमन सेंटिपेड हा चित्रपट एका जर्मन सर्जनची कथा आहे जो तीन पर्यटकांना किडनॅप करुन त्यांना प्रताडीत करतो. टॉम सिक्सच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट त्याच्या बिभत्स सीन्समुळे केवळ भारतातच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेनमध्येही बॅन करण्यात आला.

 • 10 banned foreign movies in india

  स्टीवन स्पीलबर्गचा अॅक्शन अॅडवेंचर चित्रपट 'इंडियाना जोन्स अॅण्ड द टेम्पल डूम'  भारतीय सभ्यता आणि संस्कृतीला चुकीच्या पद्धतीने चित्रीत केल्यामुळे रिलीज करण्यात आले नाही. हेरीसन फोर्डने या चित्रपटात लीड रोल केला आहे.

 • 10 banned foreign movies in india

  जनावरांबद्दल असलेल्या हिंसेमुळे 1981 साली आलेल्या 'केनिबल फेरोक्स' चित्रपटाला 31 देशांनी रिलीजवर बॅन केले.

 • 10 banned foreign movies in india

  रुगारो डेओडाटोच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'केनिबल होलोकास्ट' हा एक हॉरर चित्रपट आहे पण त्यातील खूप जास्त प्रमाणात हिंसा आणि बिभत्स सीन्समुळे हा चित्रपट बॅन करण्यात आला. कोलंबियाच्या जंगलात शूट झालेला हा चित्रपट अनेक देशांत बॅन करण्यात आला.

Trending