Home | Hollywood | Sony BBC Earth launches the Official Trailer of the Grandest Adventure to hit the Cinemas Blue Planet II

सोनी बीबीसी अर्थने लाँच केला 'ब्लू प्लानेट II'चा ट्रेलर, प्रेक्षकांना मिळणार अँडवेंचरल ट्रीट

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 03, 2018, 01:38 PM IST

ब्लू प्लानेट II : वन ओशन अँड द डीप या आगामी चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे.

  • Sony BBC Earth launches the Official Trailer of the Grandest Adventure to hit the Cinemas  Blue Planet II

    ब्लू प्लानेट II : वन ओशन अँड द डीप या आगामी चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. पीव्हीआरच्या सहयोगाने सोनी बीबीसी अर्थने हा ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटात पृथ्वीवरील सर्वात रहस्यमी ठिकाणे आणि महासागरांच्या झलक सोबत तेथे राहणा-या जीव-जंतूंची आजवर न पाहिलेल्या गोष्टींचे चित्रण करण्यात आले आहे. उदाहरणार्थ न्युझीलँडमधील जीवघेण्या व्हेलचे डॉल्फिनसोबतचे संबंध असो किंवा पाण्याबाहेर उंच उडी घेणा-या माश्यांचे कारनामे यामध्ये बघता येणार आहेत. भारतात पहिल्यांदाच हा चित्रपट 22 शहरांतील फक्त पीव्हीआर थिएटरमध्ये रिलीज केला जाणआर आहे. समुद्राच्या तळाशी आठ किलोमीटर आत जाऊन सहा हजार तासांहून अधिकचे चित्रण करण्यात आले आहे. सर डेविड एटनबरो यांचे आवाज आणि प्रसिद्ध संगीतकार हँस जिमर यांचे संगीत या चित्रपटाला आहे. ही अँडवेंचरल ट्रीट प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ठरेल, अशा विश्वास व्यक्त केला जातोय.


    पुढील स्लाईड्सवर बघा, 'ब्लू प्लानेट II'चा ट्रेलर

  • 'ब्लू प्लानेट II'चा ट्रेलर 

Trending