Home | Hollywood | Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

Behind The Scenes : असे झाले होते 'टायटॅनिक'चे शूटिंग, वाचा फिल्मचे 22 रंजक FACTS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2018, 12:14 AM IST

ब्रिटनमधील साउथ हॅम्पटनकडून न्यूयॉर्ककडे चाललेले टायटॅनिक जहाज 15 एप्रिल (1912) रोजी समुद्रात बुडाले होते.

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  एंटरटेन्मेंट डेस्कः ब्रिटनमधील साउथ हॅम्पटनकडून न्यूयॉर्ककडे चाललेले टायटॅनिक जहाज 15 एप्रिल (1912) रोजी समुद्रात बुडाले होते. या घटनेला आज 106 वर्षे पूर्ण झाली आहेत. व्हाईट स्टार लाईन कंपनीच्या 52,310 टन वजनी जहाजाने 10 एप्रिल, 1912 रोजी प्रवास सुरु केला होता. 14 एप्रिलच्या रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी टायटॅनिक जहाजाला हिमनगाचा (बर्फाचा विशाल भाग) कडा धडाकला आणि 2 तास 40 मिनिटांत हे जहाज बुडले. या अपघातात 1,500 हून जास्त प्रवासी मारले गेले होते. जहाजावर 2,224 लोक प्रवास करत होते.

  याच 'टायटॅनिक' जहाजावर आधारित 'टायटॅनिक' सिनेमा 18 नोव्हेंबर 1997 रोजी रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज होऊन आता 20 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. टायटॅनिक जहाजबुडीच्या सत्यघटनेवर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या सिनेमाचा निर्मिती खर्च 1360 कोटी इतका होता, तर सिनेमाने 14 हजार कोटींचा बिझनेस केला होता. अनेक अवॉर्ड्स या सिनेमाने आपल्या नावी केले होते. जेम्स कॅमरुन दिग्दर्शित या सिनेमात टायटॅनिक जहाज बुडण्याची घटना चित्रीत करण्यात आली होती.

  या पॅकेजमध्ये वाचा, हा चित्रपट चित्रीत होतानाच्या काही रंजक बाबी...

  > ज्या महासागराला तुम्ही सिनेमात पाहिले, ते महासागर नसून शुटिंगसाठी केवळ तीन फूट पाण्याचा तलाव तयार करण्यात आला होता.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या 'टायटॅनिक' सिनेमाशी निगडीत अशाच आणखी काही रंजक गोष्टी आणि सोबतच बघा सिनेमाचे बिहाइंड द सीन्स...

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  > निर्माते या सिनेमातील जॅकच्या भूमिकेसाठी मॅथ्यू मॅककोनाघे या अभिनेत्याला घेऊ इच्छित होते. मात्र दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी या भूमिकेसाठी लिओनार्डो डिकैप्रियोला आपली पसंती दिली होती.

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  'रोज'च्या म्हातारपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ग्लोरिया स्टुअर्ट सिनेमात काम करणारी एकमेव अशी कलाकार होती जी 1912मध्ये टायटॅनिक जहाजबुडीची घटनेची साक्षीदार होती.

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासोबतच व्हिडिओवर रिलीज होणारा टायटॅनिक पहिला सिनेमा होता. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमा म्हाता-या रोजकडे एक पॉमेरियन कुत्रा दाखवण्यात आला होता. वास्तवात टायटॅनिक जहाजबुडीची जेव्हा घटना घडली होती, तेव्हा जहाजावर एकुण तीन कुत्रे होते, त्यापैकी पॉमेरियन कुत्राच वाचू शकला होता. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमात जेव्हा खोल्यांमध्ये पाणी शिरतं, तेव्हा एक वृद्ध जोडपं शेवटच्या क्षणी एकमेकांना अलिंगन देताना दाखवण्यात आलं होतं. अखेर या जोडप्याचा मृत्यू झाल्याचे सिनेमात दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात जेव्हा जहाजबुडीची घटना घडली होती, त्यावेळी एका वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला होता. हे वृद्ध जोडपं म्हणजे न्यूयॉर्कच्या मेसी डिपार्टमेंट स्टोरचे मालक इडा आणि इसिडोर स्ट्रॉस होते

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  ऐकिवात आहे, की इडा यांना त्यावेळी लाइफबोटमध्ये बसण्याची संधी मिळाली होती. मात्र नव-यासोबत जहाजावरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. सिनेमातसुद्धा असेच एक दृश्य चित्रीत करण्यात आले होते. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  रोजच्या भूमिकेसाठी पहिली पसंती अभिनेत्री ग्वाइनेथ पॅल्ट्रो हिला होती. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  जेव्हा केट विंसलेटला समजले, की तिला लियोनार्डोसमोर न्यूड व्हायचे आहे, तेव्हा ती लिओनार्डोसोबतच्या पहिल्याच भेटीत त्याच्यासमोर न्यूड झाली होती. जेणेकरुन शुटिंगसमयी अडचण येऊ नये. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमाच्या शुटिंग सेटवर लिओनार्डोच्या पाळीव सरड्यावरुन ट्रक गेला होता, मात्र उपचारानंतर त्याला बरं करण्यात आलं होतं. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमाचा संपूर्ण सेट हायड्रोलिक जॅकोवर उभारण्यात आला होता. हा सेट सहा डिग्रीपर्यंत तिरपा करणे शक्य होते. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमात ग्रॅण्ड स्टेयरकेस रुममध्ये पाणी भरण्याचे दृश्य चित्रीत करण्यात आले होते. हे दृश्य शूट करण्यासाठी दिग्दर्शकाकडे एकच संधी होती. एका शॉटमध्ये हे दृश्य चित्रीत करणे फार महत्त्वाचे होते. कारण एवढ्या पाण्याने सिनेमाचा संपूर्ण सेट आणि त्याची सजावट नष्ट होणार होती.  

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  इंजिन रुममध्ये शुटिंग करणारे स्टंटमन केवळ पाच फूट उंच होते. एवढ्या उंचीच्या स्टंटमॅनची यासाठी निवड करण्यात आली होती, जेणेकरुन रुम मोठी दिसू शकेल. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमाचे शीर्षक सुरुवातील 'टायटॅनिक'ऐवजी 'प्लॅनेट आइस' ठेवण्यात आले होते. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमाची पूर्ण पटकथा लिहून झाल्यानंतर जेम्स कॅमरुन यांना कळले होते, की प्रत्यक्षात टायटॅनिकवर जे. डॉसन नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  शुटिंगदरम्यान जहाजावरील संपूर्ण सजावटीचे सामान व्हाइट स्टर लाइन कंपनीच्या लोकांच्या देखरेखीत होते. ही तिच कंपनी होती, जिने ख-या टायटॅनिक जहाजाचे निर्माण आणि त्याची देखरेख केली होती. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा एवढा चालला, की या सिनेमाची रील घासल्या गेली होती. नंतर पॅरामाउंट पिक्चर्सकडे या सिनेमाची रील पाठवण्यात आली होती. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमात जहाजबुडीच्यावेळी रोज ज्या नक्षीदार लाकडाचा आसरा घेते, तशीच एक कलाकृती प्रत्यक्षात घडलेल्या घटनेनंतर मिळाली होते. ती कलाकृती आजसुद्धा नोवा स्कॉटियाच्या हॅलिफॅक्स स्थित मॅरीटाइम म्युझियम ऑफ द एटलांटिकमध्ये आहे. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  अभिनेत्री केंट विंसलेटने पाण्यातील दृश्य चित्रीत करताना वेटसूट परिधान केले नव्हते. त्यामुळे तिला निमोनिया झाला होता. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  जेम्स कॅमरुन यांची या सिनेमात एकही गाणं ठेवण्याची इच्छा नव्हती. मात्र नंतर सिनेमात ठेवण्यात आलेले 'माय हार्ट विल गो ऑन' हे गाणे प्रचंड गाजले. हे गाणे गायिका सिलीन डिऑनने गायले होते. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  सिनेमात रोजचे न्यूड छायाचित्र तयार करत असताना जॅक तिला म्हणतो,  "लाय ऑन दॅट बेड, उह.…आइ मीन काउच''. खरं तर स्क्रिप्टनुसार जॅकला म्हणायचे होते, "लाइ ऑन दैट काउच". मात्र जेम्स कॅमरुन यांना लिओनार्डोची ही चुक पसंत पडली आणि त्यांनी तोच शॉट ओके केला. 

 • Behind The Scenes And Surprising Facts Titanic Movie

  >  जेम्स कॅमरुन दिग्दर्शित 'टायटॅनिक' हा पहिला असा सिनेमा होता, ज्यामध्ये आण्विक शस्त्रांचा कुठेही उल्लेख नव्हता.   

  पुढील स्लाईड्सवर बघा, टायटॅनिक या चित्रपटाचे आणखी काही ऑन लोकेशन फोटोज.. 

Trending