आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 90 व्या वर्षी या कॉमेडियनने थाटले होते लग्न, दोन दिवसांतच झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेते केन डॉड यांचे निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 9 मार्च रोजी त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न थाटले होते. त्यांचे निकटवर्तीय रॉबर्ट होम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या 90 व्या वर्षी केन यांनी त्यांची 76 वर्षीय गर्लफ्रेंड ऐनी जोन्ससोबत 9 मार्च रोजी लग्न केले होते. लग्नाच्या दोन दिवसांतच म्हणजे 11 मार्च रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 


राहत्या घरात घेतला अखेरचा श्वास...
स्टँड-अप शोजसाठी प्रसिद्ध असलेल्या केन यांनी त्यांच्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात छातीत इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी त्यांचे अनेक शोज रद्द केले होते. 


पुढील स्लाईड्सवर बघा, केन डॉड यांचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...