आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशरूममध्ये सद्दाम, भिंतीवर लेनिन-माओचे म्यूरल; असे दिसते या डायरेक्टरचे घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - हॉलिवूड डायरेक्टर रोनाल्ड एमरिच यांचे लंडनमध्ये घर आहे. त्यांच्या घराचे वैशिष्ट्य म्हणजे या घरातील फर्नीचर हे महायुद्धात वापरल्या गेलेल्या विमानांच्या पंख्यापासून तयार करण्यात आले आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या घराच्या भिंतीवर लेनीन आणि माओ अशा डाव्या नेत्यांचे म्यूरल बनवलेले आहेत. तर, वॉशरूममध्ये सद्दाम हुसैन आहे. पायऱ्यांच्या खालील जागेत पोप जॉन पॉल द्वितीय यांची मेणाची मूर्ती आहे. कॅरिडोरचे डिझाइन हे रशियाने महायुद्धासाठी तयार केलेल्या बंकरवरुन प्रेरित आहे. 

 

एमरिच यांचे म्हणणे आहे की घराच्या अशा डिझाइनमुळे त्यांना नवीन कल्पना सुचतता. त्यांचे घर हे लंडनमधील सर्वात पॉश आणि जागा व घरांच्या किंमती आकाशाला भिडणाऱ्या असलेल्या भागात आहे. ते लंडनमधील चेल्सियाच्या ब्रॉम्पटन स्क्वेअर येथे राहातात. 
एमरिच यांनी इंडिपेंडेन्स डे, डे आफ्टर टुमॉरो, गॉडझिला, सारख्या ब्लॉकबस्टर फिल्मचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या फिल्म्सने जवळपास 20 हजार कोटींपेक्षा जास्तीचा बिझनेस केला आहे. 

 

असे आहे ऑफिस... 
ऑफिसमधील फर्निचर हे दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या विमानांच्या पंख्यांचे तयार करण्यात आले आहे.  येथे ठेवण्यात आलेली खुर्ची ही मिलिटरी डेन्टिस्ट करत होते. या घराची किंमत जवळपास 42 कोटी रुपये आहे. 
- ज्या ठिकाणी हे घर आहे तिथे प्रॉपर्टीचे दर साधारण 10 लाक रुपये प्रती स्क्वेअर मीटर आहेत. 
- हे घर 28 लाख रुपये दरमाह किरायाने मिळत आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, रोनाल्ड एमरिच यांच्या घराचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...