आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 वर्षीय अभिनेता करतो जीवघेणे स्टंट, याच्यासमोर हृतिक-सलमान आहेत फेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

55 वर्षीय या अभिनेत्याच्या स्टंटपुढे सलमान खान आणि हृतिक रोशनची अॅक्शन टिकू शकत नाही. सलमान आणि हृतिक यांच्यावर वरचढ ठरणा-या या अभिनेत्याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? आम्ही बोलतोय ते बॉलिवूड अभिनेता टॉम क्रुजविषयी. टॉमच्या  'मिशन: इम्पॉसिबल'चा सहावा भाग असलेल्या 'मिशन इम्पॉसिबलः फॉलआउट'चा ट्रेलर अलीकडेच लाँच झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टॉम धमाकेदार अॅक्शन करताना दिसतोय.  ट्रेलर आणि अॅक्शन सीन्स बघून टॉमचे वय 55 वर्षे आहे, यावर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. 

 

यावर्षी जुलैमध्ये रिलीज होणार चित्रपट... 
दिग्दर्शक क्रिस्टोफर मक्कुअर्रिए यांचा हा चित्रपट जुलै महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटात टॉम क्रुज बाइक आणि कारसोबत अॅक्शन करताना दिसेल. याशिवाय पर्वत आणि इमारतींवर त्याने जीवघेणे अॅक्शन सीन्स केले आहेत. चित्रपटाच्या पुर्वीच्या भागांप्रमाणे या सीरिजमध्येही टॉम एका मिशनवर दिसणार आहे. टॉमसह हेनरी केविल, साइमन पेग, रेबेक फर्ग्यूसन, विंग रेम्स, शॉन हेरिस, एंजेला बॅसेट, वॅनेसा किर्बी, मिशेल मोनाहन, एलेक बाल्डविन, वेस बेंटले आणि फ्रेजरिक शिमिट यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.


काही दिवसांपूर्वी टॉमने या चित्रपटातील एक सीन इंस्टाग्रामवर शेअर केला होता. फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले होते,  'We’ve upped the ante for the sixth #MissionImpossible. I can’t wait for you guys to see more'. टॉमने आणखी एक फोटो शेअर करुन लिहिले, 'Get ready for the most thrilling mission yet..' 


पुढील स्लाईड्सवर बघा, चित्रपटातील आणखी काही सीन्सचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...