आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई/न्यूयॉर्कः अभिनेत्री प्रियांका चोप्राचे न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एका व्यक्तीला खुल्लमखुल्ला किस करतानाचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. पण प्रियांकाचा हा रिअल नव्हे तर रिल लाइफ ड्रामा आहे. प्रियांका सध्या न्यूयॉर्कमध्ये 'क्वांटिको'च्या तिस-या सीझनचे शूटिंग करत आहे. यावेळी तिने तिचा को-अॅक्टर एलन पॉवेलसोबत किस सीन शूट केला. या किस सीनचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल होत आहेत.
लाँग ड्रेससोबत डार्क लिपस्टिकमध्ये दिसली प्रियांका...
या फोटोजमध्ये प्रियांका आणि एलन ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. प्रियांकाने लाँग ड्रेससोबत डार्क लिपस्टिक लावले असून मॅचिंग हिल्स घातले आहेत. तर दुसरीकडे पॉल एलन ब्लॅक कॅपसोबत कोट पँटमध्ये दिसतोय. एका सीनमध्ये हे दोघे पॅशनेट लिपलॉक करताना दिसत आहेत. क्वांटिकोच्या नवीन सीझनमध्ये प्रियांकाचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
पहिल्या आणि दुस-या सिझनमध्ये होते 22-22 एपिसोड...
- क्वांटिकोचे पहिले पर्व 27 सप्टेंबर 2015 ते 15 मे 2016 याकाळात प्रसारित झाले होते.
- या शोचे दुसरे पर्व 25 सप्टेंबर 2016 ला सुरु झाले होते. तर याचा शेवटचा एपिसोड 15 मे 2017 रोजी टेलिकास्ट झाला होता.
- दोन्ही सिझनमध्ये 22-22 एपिसोड्स प्रसारित झाले होते.
- रिपोर्ट्सनुसार, आता तिस-या सिझनमध्ये अवघे 13 एपिसोड्स टेलिकास्ट होणार आहेत.
- क्वांटिकोमध्ये प्रियांका चोप्राने एलेक्स पेरिशची भूमिका वठवली असून ती एक इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची ऑफिसर असते.
पुढील स्लाईड्सवर बघा, प्रियांका चोप्रा आणि तिचा को-स्टार एलेन पॉवेलचे आणखी काही PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.