Home | Hollywood | merilyn monroe birthday special story

मर्लिनच्या सौंदर्याला होता अभिशाप! ड्रग्ज, अनाथाश्रम, तुटलेली लग्ने आणि अखेर केली आत्महत्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 01, 2018, 02:35 PM IST

सोशल मीडियावर असे फार कमी लोक असतील ज्यांना मर्लिन म्युरोविषयी माहिती नाही.

 • merilyn monroe birthday special story

  सोशल मीडियावर असे फार कमी लोक असतील ज्यांना मर्लिन म्युरोविषयी माहिती नाही. मृत्यूच्या 50 वर्षानंतरही मर्लिनच्या सौंदर्याची सर्वांनाच भूरळ पडते. काही जण मर्लिनला अजूनही सेक्स सिंबल मानतात आणि तिच्या अदांमुळे घायाळ आहेत. आज मर्लिनची बर्थ अॅनिवर्सरी आहे. हॉलिवूडमधील एक बिनधास्त, सुंदर आणि मादक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या मर्लिन म्यूरोविषयी खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

  फार कमी लोकांना माहीत आहे की, मर्लिन केवळ एक लोकप्रिय अभिनेत्री नव्हे तर गायिकाही होती. मर्लिन मुनरोच्या सौंदर्याचे आणि तिच्या अफेअरचे किस्स्यांची आजही चर्चा होते. मर्लिन मुनरोच्या चेहऱ्याची निरागसता, मादक डोळे आणि तिच्या ओठांच्या सुंदरतेसाठीही लोकप्रिय होती.

  मुनरोचा जन्म 1 जून 1926 रोजी अमेरिका येथील लॉस एंजिलीस येथे झआला. तिचे खरे नाव नॉरमा जीन मोर्टेनसेन होते. मर्लिनच्या जन्मावेळी तिचे आईवडील विवाहीत नव्हते. मर्लिनचे लहानपण फार कष्टात गेले आणि तिने अनेक वर्षे अनाथश्रमात घालवले. वयाच्या 16व्या वर्षीच तिने लग्न केले होते.

  ग्लॅमरस गर्ल मर्लिन मुनरोला कॅलेंडर गर्लच्या रुपात खूप लोकप्रियता मिळाली जेव्हा तिचे नग्न फोटो कॅलेंडरवर झळकले होते. एकीकडे तिच्या या नग्न फोटोंचे खऊप कौतुक झाले तर दुसरीकडे इंडस्ट्रीच्या लोकांचे खराब कमेंट्सही मिळाले.

  पुढच्या स्लाईडवर वाचा, खऱ्या प्रेमासाठी तरसत होती मर्लिन...

 • merilyn monroe birthday special story

  खऱ्या प्रेमासाठी तरसत होती मर्लिन..


  ग्लॅमरस जगात आपल्या मनातील गोष्टी सांगणे फार अवघड काम असते. कोणाकडेही आपल्या मनातील भावना व्यक्त करणे नेहमीच जिकीरीचे असते पण ग्लॅमरस जगातील लोकांच्याही मनात काही भावना असतात आणि ते त्यांना व्यक्त करायला फार आवडते. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप मोठमोठी दुःखे ते लपवतात आणि असेच काहीसे मर्लिनच्या बाबतीत घडले होते.  
  मर्लिनने जगभरातील लोकांच्या मनावर राज्य केले पण तिच्यावर खरेखुरे प्रेम करेल असा एकही व्यक्ती तिच्या आयुष्यात आला नाही.  खऱ्या प्रेमासाठी ती कायम तरसत राहिली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. 

 • merilyn monroe birthday special story

  मर्लिन मुनरोची डायरी..


  मर्लिनला तिच्या आयुष्याचे अनुभव डायरीमध्ये लिहीण्याची सवय होती. तिची हीच डायरी काही वर्षांपूर्वी लोकांसमोर आली तेव्हा सर्वांना आष्चर्याचा धक्का बसला कारण झगमगाटीच्या जगात वावरणारी मर्लिन खऱ्या आयुष्यात फारच दुःखी होती. अतिशय अल्लड वाटणारी मर्लिन किती दुःखी होती हे तिच्या डायरीवरील लेखनावरुन सर्वांना कळाले. तिने एका पेजवर लिहीले होते की, मी रधीकोधी लोकांना सहन करु शकत नाही. मला कळते की माझ्या प्रमाणेच इतर लोकही त्यांच्या त्यांच्या समस्यांचा सामना करत आहेत पण मी आता केवळ दुसऱ्यांच्या समस्या ऐकून  आणि त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स सोडवून सोडवून आता कंटाळली आहे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करुन आता मला कंटाळा आला आहे.

 • merilyn monroe birthday special story

  करिअरसाठी काहीही करण्याची होती तयारी..


  मर्लिन मुनरो लिहीते की, हॉलिवूड चित्रपटात काम करणे, स्टार बनणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे ध्येय होते आणि यासाठी मी माझ्या लाजेला कधीही आड येऊ दिले नाही. मी माझ्या करिअरसाठी वाट्टेल ते करायला तयार होते आणि त्यासाठी वाट्टेल त्या संकटातून जाण्यास तयार होते.

   

 • merilyn monroe birthday special story

  मर्लिन मुनरोने केले तीन लग्न..


  मर्लिन मुनरोने तिच्या आयुष्यात तीन लग्ने केली पण या तिन्ही लग्नांचा शेवट घटस्फोटात झाला.  1942 साली मर्लिनने पहिले लग्न जेम्स डार्थीसोबत लॉस एंजिलीस येथे केले होते तर तिने दुसरे लग्न 1954 साली बेसबॉल प्लेअर जो डिमेग्योसोबत केले होते. त्यानंतर तिने तिसरे लग्न लोकप्रिय लेखक आर्थरसोबत 1956 साली केले. 

 • merilyn monroe birthday special story

  कोणीच कोणावर प्रेम करत नाही..


  मर्लिनच्या डायरीत लिहीले होते की, एकदा मिलरने काही मित्रांसमोर तिच्यासबत अश्लील विनोद केला आणि यामुळे तिला फार वाईट वाटले. तिला इतके वाईट वाटले की तिने डायरीत लिहीले, मी एक पत्नी बनायला नेहमीच फार घाबरते कारण मला माहीत आहे की जगात कोणीच कोणावर प्रेम करत नाही. माणसाला स्वतःचीच काळजी स्वतः घ्यावी लागते. कोणीच कोणाच्या भावना समजु शकत नाही.

 • merilyn monroe birthday special story

  खूप प्रॅक्टील होती मर्लिन मुनरो..


  मर्लिन मुनरोचे डॉक्युमेंट्स पाहिले असता ती फार प्रोफेशनल महिला होती हे लगेचच कळते. बाहेर अगदी चंचल असलेली मर्लिन किती गंत्रीर होती हे तिच्याजवळचे लोक तिला कधीच समजू शकले नाही. लोकांना तिच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या तर तिच्या स्वतःच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. पण तरीही तिने तिच्या करिअरमध्ये या गोष्टीचा प्रभाव पडू दिला नाही. लोकांच्या अपेक्षांमध्येच ती तिचे सुख शोधत राहिली पण ते तिला कधीही मिळाले नाही.

 • merilyn monroe birthday special story

  असे परतला तिच्या जीवनात आनंद...


  The Telegraph  मधील माहिती नुसार,  मरणाच्या काही दिवसअगोदरच मर्लिन दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती. घटस्फोट झाल्यानंतर डिमेग्योने दारु पिणे बंद केले होते आणि पुन्हा त्याने बेसबॉल खेळण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्याच्या वाईट सवयीत सुधारणा झाली होती आणि त्यामुळे मर्लिन पुन्हा त्याच्याकडे आकर्षित झाली होती आणि त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढली होती. 

 • merilyn monroe birthday special story

  असा झाला मृत्यू..


  पण मर्लिन खुश असलेले नियतीला मान्यच नव्हते कदाचित आणि त्यामुळेच 6 ऑगस्ट 1962 साली केवळ 36व्या वर्षी मर्लिन तिच्या घरी मृतावस्थेत सापडली. झोपेच्या गोळ्यांची रिकामी बाटली तिच्या बेडवर सापडली आणि असे म्हटले जाते की तिने आत्महत्या केली. गेली अनेक वर्षे असेही म्हटले जात होते की तिची हत्या झाली आहे पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू ड्रग्ज ओव्हरडोसमुळे झाला असल्याचे कळाले. 

 • merilyn monroe birthday special story

  मर्लिन मुनरोच्या मृत्युचे खरे कारण तर ड्रग्ज ओव्हरडोस होते पण ड्रग्ज तिने स्वतः घेतले की ते दिले गेले ते कोडे आजपर्यंत सुटले नाही. मनमोकळे जीवन जगणाऱ्या मर्लिनने आत्महत्या केली यावर आजही काहीजण विश्वास ठेवण्यास नकार देतात ते यामुळेच.

   

Trending