Home | Hollywood | Pop Singer Michael Jacksons 9th Death Anniversary या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यम, वाचा त्याच्याविषयी A to Z

Death Anniv: या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यमयी, वाचा त्याच्याविषयी A to Z

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 25, 2018, 12:33 PM IST

पॉपच्या जगातील बादशाह दिवंगत मायकल जॅक्सनला या जगाचा निरोप घेऊन 9 वर्षे लोटली आहेत.

 • Pop Singer Michael Jacksons 9th Death Anniversary या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यम, वाचा त्याच्याविषयी A to Z


  एन्टरटेन्मेंट डेस्कः पॉपच्या जगातील बादशाह दिवंगत मायकल जॅक्सनला या जगाचा निरोप घेऊन 9 वर्षे लोटली आहेत. 25 जून 2009 रोजी मायकल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता. मायकल जॅक्सन हे नाव जगातील प्रत्येकाच्या परिचयाचे आहे. 13 ग्रॅमी अवॉर्ड्स आपल्या नावी करणारा मायकल एकमेव कलाकार आहे. याशिवाय गिनीज अवॉर्ड, 26 अमेरिकन म्युझिक अवॉर्ड, ग्रॅमी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि ग्रॅमी लीजेंड अवॉर्डने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डसमवेत अनेक अवॉर्ड नावी करणारा मायकल जॅक्सन एकमेव कलाकार होता, ज्याने पॉप संगीताचे जगच बदलून टाकले.

  मायकल जॅक्सनचे संपूर्ण आयुष्यच रहस्यमय होते. मात्र त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याच्या चाहत्यांना काळजीत टाकले होते. ही गोष्ट 27 जानेवारी 1984ची आहे. जॅक्सन त्यादिवशी लॉस एंजिलिस येथे पेप्सी या प्रसिद्ध कोल्डड्रिंकसाठी जाहिरातीचे शूटिंग करत होतो. या जाहिरातीत स्पेशल इफेक्ट होते. शूटिंग करत असताना जॅक्सनच्या केसांना अचानक आगा लागली. त्यावेळी सेटवर जवळजवळ तीन हजार लोक उपस्थित होते. सर्वांना जॅक्सनच्या डोक्याला आग लागल्याचे दिसले. आग लागूनदेखील जॅक्सन मुळीच डगमगला नाही आणि 'बिली जीन' या गाण्यावर परफॉर्म करत राहिला.

  प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, जणू काही घडलेच नाही, असे जॅक्सन त्यावेळी वागला होता. मात्र आग लागल्याचे बघून लोकांनी ती विझवली आणि स्ट्रेचरवर ब्रॉटमन मेडिकल सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आले. ज्या वॉर्डमध्ये मायकलला दाखल करण्यात आले होते, त्याचे नाव नंतर मायकल जॅक्सन बर्न सेंटर असे ठेवण्यात आले होते.


  पुढील स्लाईड्समध्ये वाचा, मायकल जॅक्सनच्या आयुष्याशी छोटीशी कहाणी...

 • Pop Singer Michael Jacksons 9th Death Anniversary या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यम, वाचा त्याच्याविषयी A to Z

  पॉप दुनियेतील पदार्पण... 

   

  आई-वडिलांचा आठवा मुलगा मायकल जॅक्सनला बालपणापासून संगीतात रुची होती. 1964मध्ये तो त्याच्या भावासोबत 'द जॅक्सन' ग्रुपमध्ये सामील झाला होता. सहा वर्षांनंतर 1971मध्ये त्याने संगीतात स्व:बळावर करिअर उभे केले. 1980दरम्यान जॅक्सन संगीताचा स्टार बनला होता. 'बीट इट, बिली जीन' आणि 'थ्रिलर' या अल्बमने त्याला लोकप्रिय केले. त्याला जगातील प्रत्येक माणूस ओळखायला लागला होता. लोकांना पॉप संगीताची ओळख करून देणा-या मायकल जॅक्सनला अनेक लोकांनी पाहिलेदेखील नव्हते. तरी त्याचे चाहते बनले होते.

 • Pop Singer Michael Jacksons 9th Death Anniversary या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यम, वाचा त्याच्याविषयी A to Z

  उजळले भाग्य... 

   

  1987 मध्ये बँड अल्बम आल्यानंतर मायकलच्या लोकप्रियतेत भर पडली. मात्र याच काळात त्याने प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्याचीही चर्चा झाली. त्याचा नवीन लूक बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्या अल्बमच्या तीन कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. अनेकदा चेह-यात बदल करुनसुद्धा मायकलने प्लास्टिक सर्जरी केल्याचे कधीही मान्य केले नाही. मायकल मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी होती. त्याला आजही त्याच्या नृत्यासाठी विशेषतः मून डान्ससाठी स्मरले जाते. त्याच्या लोकप्रियतेला वादाचीही किनार होती. बेस्ट सेलिंग आर्टिस्टपासून ते बाल लैंगिक छळ, प्लास्टिक सर्जरी आणि आपल्या फॅशनमुळे तो नेहमी चर्चेत राहिला. 

 • Pop Singer Michael Jacksons 9th Death Anniversary या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यम, वाचा त्याच्याविषयी A to Z

  मायकलशी निगडीत वाद... 

   

  लैंगिक छळाचा आरोप -  1987मध्ये त्याची आत्मकथा प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर 11 वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मायकलने हा आरोप खोटा असल्याचे म्हटले होते. मात्र तरीदेखील या प्रकरणातून सुटका करुन घेण्यासाठी त्याला मुलाच्या आईवडिलांना दोन कोटी अमेरिकन डॉलर द्यावे लागले होते. 
   

  पुन्हा झाले असे आरोप - 2003 मध्ये मायकलला पुन्हा एकदा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पाच महिने कायदेशीर कारवाई चालली. पाच महिन्यांनी त्याच्यावरील आरोप खोटे सिद्ध झाले. त्याकाळात मायकल दिवाळखोर झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. 
   

 • Pop Singer Michael Jacksons 9th Death Anniversary या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यम, वाचा त्याच्याविषयी A to Z

  मायकल जॅक्सनचे वैवाहिक आयुष्य...

   

  मायकल जॅक्सनने 1994 मध्ये मैरी प्रिंसलेसोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या 19 महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 1997 मध्ये त्याने पुन्हा संसार थाटला. नर्स डेबी रोवसोबत त्याने दुसरे लग्न केले. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा संसार मोडला. डेबी आणि जॅक्ससनला दोन मुले असून प्रिन्स आणि पेरिस ही त्यांची नावे आहेत. 
   

 • Pop Singer Michael Jacksons 9th Death Anniversary या पॉप सिंगरचे खासगी आयुष्य होते रहस्यम, वाचा त्याच्याविषयी A to Z

  मायकलशी आयुष्याशी निगडीत फॅक्ट्स... 

   

  - मायकलने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या सातव्या वर्षी केली होती. बौंगो आर्टिस्ट म्हणून त्याने कामाला सुरुवात केली होती. 


  - 1971 मध्ये सोलो आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली. 


  - 1980मध्ये मायकल पॉप स्टार बनला होता. Beat it, Billie Jean हे व्हिडिओ ब्लॉकबस्टर ठरले होते. 


  - जॅक्सनच्या बेस्ट सेलिंग अल्बम्समध्ये ऑफ द वॉल (1979), थ्रिलर (1982), बैड (1987), डेंजरस (1991) प्रमुख आहेत. 


  - 13 ग्रॅमी अवॉर्ड्स प्राप्त करणारा मायकल एकमेव कलाकार आहे. 

Trending