आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Swedish DJ Avicii Passes Away At The Age Of 28 जगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी निधन

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारुच्या व्यसनाने संपले जीवन, जगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जगप्रसिद्ध स्वीडिश डीजे एविचीचे ओमानची राजधानी मस्कतमध्ये 20 एप्रिल रोजी निधन झाले आहे. एविचीने वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. एविचीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.  पण अतिमद्यपामुळेच त्याने जीव गमावला, असे म्हटले जात आहे. एविचीच्या अकाली निधनाच्या बातमीने त्याचे कुटुंब कोलमडून गेले असून या कठिण काळात चाहत्यांनी आणि सर्वांनीच एविचीच्या कुटुंबियांच्या खासगी आयुष्याचा सन्मान केला पाहिजे असे प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटले आहे. निधनाच्या दोन दिवस आधीच एविचीला टॉप डान्स आणि इलेक्ट्रॉनिक अल्बमसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 

 

अनेक आजारांनी होता ग्रस्त..
- एविचीला दारुचे व्यसन जडले होते. 
- अतिमद्यपानामुळे त्यला पोटासंबंधित अनेक आजार होते.
- 2014 मध्येच त्याचे गॉल ब्लॅडर आणि अपेंडिक्स काढून टाकण्यात आले होते.
- 2015 पासून त्याने टूरवर जाणे बंद केले होते. फक्त स्टुडिओतच तो काम करायचा.    

 

इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकला मेनस्ट्रीममध्ये आणण्याचे श्रेय.. 
- डीजे आणि रेकॉर्ड प्रोड्यूसर असलेल्या एविचीला लोक त्याच्या इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखतात. इलेक्ट्रॉनिक म्युझिकला मेन स्ट्रीममध्ये आणण्याचे श्रेय एविचीला जाते.  
- एविचीचे मूळ नाव टिम बर्जलिंग होते. 
- जगातल्या वेगवेगळया देशांमध्ये एविचीने कार्यक्रम केले होते. त्यामुळे जगभरात त्याचा चाहता वर्ग आहे.
-  एविचीला दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक अॅवॉर्ड मिळाला आहे. ‘वेक मी अप’, ‘द डेज’ आणि ‘यू मेक मी’ ही एविचीची गाणी बरीच गाजली.
- एविचीचे ‘वेक मी अप’ हे गाणे 2012 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. 2012 साली आलेल्या True या डेब्यु अल्बमपासूनच एविचीने स्वत:हाची एक वेगळी ओळख निर्माण केली.  

 

कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली..
- पॉप गायिका मेडोनाने त्याच्या अखेरच्या अल्बमच्या निर्मितीसाठी त्याला मदत केली होती. मेडोनाने त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन लिहिले, 'So Sad....... So Tragic. Good Bye Dear Sweet Tim. 💙 Gone too Soon. #avicii'.

बातम्या आणखी आहेत...