आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये बेबी बंपसोबत दिसल्या या सेलेब्स, अँजेलिनाने ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाफ्टा अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अॅक्ट्रेस रेबेका फर्गुसन, डचेस ऑफ कॅम्ब्रिज फेम केट मिडलटन आणि अँजेलिना जोली - Divya Marathi
बाफ्टा अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर अॅक्ट्रेस रेबेका फर्गुसन, डचेस ऑफ कॅम्ब्रिज फेम केट मिडलटन आणि अँजेलिना जोली

लंडन/मुंबईः लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये नुकताच 31 वा बाफ्टा (ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्स) अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अनेक प्रेग्नेंट अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होती. यावेळी  स्वीडिश अभिनेत्री रेबेका फर्गुसन बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. तर दुसरीकडे डचेस ऑफ कॅम्ब्रिज केट मिडलटनसुद्धा ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये प्रेग्नेंसी लूकमध्ये दिसली.  या सोहळ्यात 'थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग मिसौरी' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पाच अवॉर्ड आपल्या नावी केले. या चित्रपटाला बाफ्टात नऊ श्रेणीत नामांकने मिळाली होती.  'द शेप ऑफ वॉटर' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला. 

 

बाफ्टामध्ये यांना मिळाले अवॉर्ड...  

सर्वोत्कृष्ट चित्रपट  - 'थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग मिसौरी'
सर्वोत्कृष्ट अभिनेता - गॅरी ओल्डमन, चित्रपट-  डार्केस्ट ऑवर
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रांसिस मॅकडोरमँड, चित्रपट - थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग मिसौरी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गुइलेरमो डेल टोरो, फिल्म- द शेप ऑफ वॉटर
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री - एलिसन जेनी, आई टोनाया
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ब्लेड रनर 2049
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले - थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग मिसौरी
सर्वोत्कृष्ट स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्स- ब्लेड रनर 2049
सर्वोत्कृष्ट साउंड - डंकिर्क


पुढील स्लाईड्सवर बघा, बाफ्टा अवॉर्डमध्ये पोहोचलेल्या अभिनेत्रींचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...