आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकासोबत रिलेशनशिपवर काय म्हणते निक जोनासची Ex-Girlfriend! येथे वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास - बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये सुद्धा देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि गीककार निक जोनास यांच्या अफेअर तसेच कथित एंगेजमेंटच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका 35 आणि निक (25) एकमेकांना डेट करत आहेत. प्रियांकाने नुकतेच अंबानिया यांच्या घरात पार पडलेल्या एंगेजमेंट सोहळ्यात आपला बॉयफ्रेंड निकसोबत हजेरी लावली. सोबतच अमेरिकेत मेमोरिअल वीकेंड सुद्धा त्यांनी एकत्रित साजरा केला. सगळीकडे ह्या चर्चा सुरू असताना दोघांच्या अफेअरचे वृत्त निक जोनासची एक्स गर्लफ्रेंड आणि सिंगर डेल्टा गुडरेम हिच्यापर्यंत पोहोचले. हॉलिवूड मॅगझीन वूमन्स डे आणि कॉस्मोपॉलिटनच्या वृत्तानुसार, निक आणि डेल्टा 2011 पर्यंत एकमेकांना डेट करत होते. ब्रेक-अप झाल्यानंतरही ती निक आणि त्यांच्या भाऊ जो जोनासच्या संपर्कात होती. 


पुन्हा निकवर प्रेम व्यक्त करणार होती एक्स गर्लफ्रेंड...
> निक जोनासचा भाऊ जो जोनास द व्हॉइस या टीव्ही शोमध्ये काम करत आहे. त्याच शो मध्ये निकची एक्स गर्लफ्रेंड डेल्टा जो याची को-स्टार आहे. निक आणि डेल्टा यांचे 2011 मध्ये ब्रेक-अप झाले, तेव्हा निकने पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढेच नव्हे, तर निकने तिच्या आयुष्यात पुन्हा येणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु, शूटिंग दरम्यान निकचा भाऊ जो जोनासने डेल्टाला निक आणि प्रियांकाच्या अफेअरची माहिती दिली. तसेच प्रियांकासाठी निक सीरियस आहे असेही सांगितले. 
> प्रियांका केवळ एक हॉलिवूड अभिनेत्रीच नव्हे, तर ब्रिटनच्या शाही घराण्याची सून मेघन मार्कलची बेस्ट फ्रेंड आहे. एक नवोदित हॉलिवूड स्टार जिच्या मैत्रिणींपैकी एक ब्रिटिश रॉयल आहेत ती आपल्या निकला डेट करत असल्याची माहिती डेल्टाला मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला. प्रियांकासोबत तुलना केल्यास आपण कुठेच नाही. अशात निक जोनास प्रियांकाला सोडून आपल्याकडे कधीच येणार नाही याची जाणीव डेल्टाला झाली. यानंतर डेल्टा जो जोनासकडे खूप रडली. आता तिचे पुढचे पाऊल काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...