Home | Hollywood | box office reveneu of Avengers cinema in india

अॅव्हेंजर्स : प्रचार खर्चाच्या तुलनेत जगात 6 पट, देशात 15 पट कमाई

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - May 06, 2018, 01:59 AM IST

अॅव्हेंजर्स : द इनफिनिटी वॉरची दुसऱ्या आठवड्यात द जंगल बुकचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

 • box office reveneu of Avengers cinema in india

  अॅव्हेंजर्स : द इनफिनिटी वॉरची दुसऱ्या आठवड्यात द जंगल बुकचा विक्रम मोडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात द जंगल बुकचा लाइफ टाइम कमाईचा विक्रम मोडेल. या चित्रपटाचे प्रोमो बजेट १५० दशलक्ष डॉलर (९७५ कोटी रुपये) होते. या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ९० कोटी डॉलरपेक्षा (५,८५० कोटी रुपये) जास्त कमाई केली आहे.

  म्हणजे प्रोमो बजेटपेक्षा ६ पट जास्त. दुसरीकडे भारतातही त्याची कमाई वेगाने वाढत आहे. याबाबत चित्रपट वितरक आणि बॉक्स ऑफिसचे विश्लेषक सुनील वाधवा यांनी सांगितले की, भारतात मार्व्हेलने या चित्रपटाच्या प्रचारावर सुमारे १० कोटी रुपये खर्च केले आहेत. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत १५६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. म्हणजे चित्रपटाने भारताच्या प्रोमो बजेटपेक्षा १५ पट जास्त कमाई केली आहे. ते म्हणाले की, हॉलीवूडचे चित्रपट आता बॉलीवाडूच्या चित्रपटांच्या मार्केटवरही परिणाम करत आहेत. भारतात बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपटांच्या बाजारात हॉलीवूड चित्रपटांचा वाटा २०१३ मध्ये ११ टक्के होता, तो आता २०१७-१८ मध्ये वाढून २०-२१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.


  बॉलीवूडचे ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा म्हणाले की, अॅव्हेंजर्स : द इनफिनिटी वॉरवर कंपनीने ८-१० कोटी रुपयेच खर्च केले आहेत. पण हा चित्रपट देशात चांगला व्यवसाय करत आहे. आता भारतीय प्रेक्षकांना इंटरनेटमुळे जागतिक चित्रपटांचे चांगले एक्सोपजर झाले आहे.


  अॅव्हेंजर्स : इनिफिनिटी वॉर्स आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिरो असलेला चित्रपट आहे. त्यात मार्व्हलचे आतापर्यंतचे गेल्या एक दशकात आलेल्या १८ चित्रपटांचे सुमारे ७६ पात्र आहेत. त्यापैकी २० पेक्षा जास्त सुपरहिरो आहेत. चित्रपटाचा शेवट अत्यंत नाट्यमय आहे आणि भारतीय प्रेक्षक त्याचा क्लायमॅक्स बाहुबलीसारखा असल्याचे सांगत आहेत. कटप्पाने बाहुबलीला का मारले, असा प्रश्न बाहुबलीमध्ये होता. यातील सस्पेन्स म्हणजे चित्रपट इतिहासातील सर्वाधिक शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या थानोस या खलनायकाला कोण मारेल? हा आहे.


  हॉलीवूड चित्रपटांचे ट्रेड विश्लेषण तरण आदर्श म्हणाले की, प्रेक्षकांना क्वालिटी एंटरटेनमेंट आणि व्हिज्युअल अपील हवे, ते हॉलीवूडच्या चित्रपटांत चांगले मिळत आहे. अॅव्हेंजर्सबाबत ते म्हणाले की, चित्रपटात एकाच वेळी एवढे सुपरहिरो असणे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. त्याचबरोबर त्याचा खलनायक अत्यंत शक्तिशाली आहे.


  खलनायकाची एक भावनिक बाजूही आहे, त्यामुळे तो प्रेक्षकांना आवडत आहे. वितरक आणि ट्रेड विश्लेषक अमोद मेहरा यांनी सांगितले की, अव्हेंजर्स हा मल्टीस्टारर चित्रपट आहे, त्यामुळे प्रेक्षक खेचले जात आहे. आधी हॉलीवूडचे चित्रपट फक्त दिल्ली, मुंबई यांसारख्या शहरांतच लागत असत. पण आता मल्टीप्लेक्सच्या वाढत्या संख्येमुळे जास्त प्रेक्षक ते पाहू शकतात. गेल्या ८-१० वर्षांत टीव्हीवरही डब हॉलीवूड चित्रपट वाढले आहेत. त्यामुळे ते भारतीय प्रेक्षकांत जास्त चर्चित होत आहेत.

  हॉलीवूड यामुळे यशस्वी
  - आता हॉलीवूडचे मोठे चित्रपट देशात २०००-२५०० स्क्रीन्सवर रिलीज होत आहेत. हा आकडा यासाठी मोठा कारण ‘टायगर जिंदा है’सारखा चित्रपट डोमेस्टिक मार्केटमध्ये ४६०० स्क्रीनवर रिलीज झाला होता.
  - बॉलीवूडमध्ये थ्रीडी चित्रपट चांगले बनत नाहीत. थ्रीडीचे शौकीन प्रेक्षक हॉलीवूडचे चित्रपट पाहत आहेत. हॉलीवूड चित्रपटांच्या भारतातील व्यवसायापैकी ८० टक्के कमाई थ्रीडी स्क्रीनद्वारे होते.
  - बॉलीवूड-हॉलीवूडच्या चित्रपटांची रिलीज तारीख एक येऊ नये यासाठी विदेशी स्टुडिओ अमेरिकेआधी भारतात चित्रपट रिलीज करत आहेत. द जंगल बुक, जर्नी २ : द मिस्टिरियल आयलंड, अॅव्हेंजर्स : द एज ऑफ अल्ट्रॉन हे चित्रपट त्याचे उदाहरण आहे.

  चित्रपट सुपरहीरोचा, चर्चा व्हिलनची
  देशभरात अॅव्हेंजर्स : द इनफिनिटी वॉर सुमारे ५०% स्क्रीन्सवर हिंदी, तामिळ आणि तेलगूत रिलीज झाला आहे. त्यामुळेच त्याचे प्रेक्षक वाढले. एवढे सुपरहीरो असूनही व्हिलन थानोस चर्चेत आहे. चित्रपटाअखेरीस तो जिवंत राहतो आणि पुढील भागात त्याला कोण मारेल याची चर्चा आहे. पुढील भागात कोणते सुपरहीरो येतील याचीही चर्चा आहे. चित्रपटात प्रेक्षक व्हिलनलाच जास्त टाळ्या वाजवत आहेत.

  पुढील स्‍लाइडवर वाचा, भारतात हिट राहिलेले ५ अव्वल चित्रपट...

 • box office reveneu of Avengers cinema in india
 • box office reveneu of Avengers cinema in india
 • box office reveneu of Avengers cinema in india

  जगभरात सर्वाधिक कमाई करणारे हॉलीवूडचे चित्रपट

  १. अवतार

  एकूण कमाई : २७८८ दशलक्ष डॉलर
  फॉक्स स्टुडिओच्या २००९ मध्ये आलेल्या या चित्रपटाने देशातील बाजारात ७६०.५ दशलक्ष डॉलर कमावले, विदेशात २०२७ दशलक्ष डॉलरची कमाई केली.

   

 • box office reveneu of Avengers cinema in india

  २. टायटॅनिक
  एकूण कमाई : २१८७. ५ दशलक्ष डॉलर
  १९९७ मध्ये आलेल्या चित्रपटाने देशातील बाजारात ६५९.४ दशलक्ष डॉलर, विदेशात १५२८.१ दशलक्ष डॉलर कमावले.

 • box office reveneu of Avengers cinema in india

  ३. स्टार वॉर्स : द फोर्स अवेकन्स
  एकूण कमाई : २०६८.२ दशलक्ष डॉलर
  देशाच्या बाजारात ९३६.७ दशलक्ष डॉलरचा व्यवसाय केला. विदेशात ११३१. ६ दशलक्ष डॉलर कमावले.

Trending