आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Julie Gayet Affairs With French President?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत नाव जोडल्याने ज्युली गेट अखेर कोर्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ओलाँद यांच्याशी संबंध असल्याच्या बातम्या इंटरनेटवर आल्यानंतर भडकलेली फ्रेंच अभिनेत्री ज्युली गेट हिने अखेर कोर्टाचा दरवाजा खटकावला आहे.

ओलाँद यांच्यासोबत संबंध असल्याच्या बातम्यामुळे गेट कमालीची त्रस्त असून, आपल्या खासगी जीवनावर हा डल्ला असल्याची तक्रार तिने केली आहे. तसेच असल्या फालतू बातम्यामुळे आपल्या व्यक्तिगत जीवनात वादळ उठल्याचे तिने मान्य केले.


फ्रान्समध्ये गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत ज्युली गेट हिने ओलाँद यांच्या प्रचारात व त्यांच्या जाहिरातींमध्ये काम केले होते. त्याकाळात हे दोघे जवळ आल्याचे सांगण्यात येते. मात्र ज्युलीने ही बाब स्पष्ट नाकारली असून, हा आपल्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच त्रस्त झालेल्या 40 वर्षीय ज्युली गेटने पॅरिस कोर्टात खटला दाखल केला आहे. ओलाँद यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजेच ब्लॉगर्सनी हे वृत्त पसरविल्याचे सांगण्यात येत आहे.