आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Along With Team Of AmfAR Work Magic

amfAR डिनर पार्टीत दिसला ऐश्वर्याचा ग्लॅमरस लूक, पोहोचले अनेक स्टार्स, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 67व्या कान फिल्म फेस्टिव्हल आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. 14 मे पासून सुरु झालेल्या या फेस्टिव्हलचा समारोप 25 मे रोजी होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील अनेक तारे-तारकांनी आपल्या उपस्थितीने चारचाँद लावले. येथे अनेक सिनेमांचे प्रीमिअर आयोजित करण्यात आले होते. प्रीमिअरदरम्यान रेड कार्पेटवर तारे-तारकांची मांदियाळी बघायला मिळाली.
या इवेंटदरम्यान 21व्या amfAR डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बॉलिवूड ब्युटी ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक बच्चनसह सहभागी झाली होती. यावेळी आयोजित लिलावादरम्यान एड्स रुग्णांसाठी 35 मिलियन युएस डॉलर्स जमा झाले.
वरील छायाचित्रात ऐश्वर्या राय बच्चन मॅरियन कोटिलार्डसह दिसत आहे. amfAR डिनर पार्टीतच हे छायाचित्र क्लिक करण्यात आले. यावेळी ऐश्वर्या रॉबर्टो कॅव्हॅली लूकमध्ये दिसली. या पार्टीत हॉलिवूडमधूल जॉन ट्रावोल्टा, जस्टिन बीबर, हीदी क्लेम, केली प्रेस्टन, लियोनार्डो दी कॅपरियासह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा amfAR डिनरमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...