आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माबरोबर परत झळकू शकतो हा कॉमेडियन, म्हणाला आम्ही वेगळे झालोच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'द कपिल शर्मा शो' मध्ये नानीचे पात्र साकारणारा अली असगर सध्या 'लिप सिंक बॅटल' आणि 'द ड्रामा कंपनी' मध्ये झळकत आहे. विशेष म्हणजे मार्चमध्ये अलीने कपिलच्या शोला अलविदा म्हटले होते. पण आता त्याचे म्हणणे आहे की, तो कपिलच्या सोमध्ये परतू शकतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केले आहे. कपिलने पुन्हा शो सुरू केला तर त्याच्याबरोबर काम करणार का असे त्याला विचारण्यात आले होते. 

अलीने असे दिले उत्तर.. 
- अली म्हणाला, नक्कीच मी त्याच्याबरोबर काम करेल. आम्ही एकमेकांपासून वेगळे झालेलो नाही. मी कपिलचा शुभचिंतक आहे आणि लवकरच तो बरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. 
- कपिलची तब्येत ठीक नसल्यामुळे त्याने टिव्हीवरून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. नुकतेच एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, सध्या तो बेंगळुरूमध्ये उपचार घेत आहे. सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत तो परतणार आहे. त्यानंतर फिरंगी चित्रपटाचे प्रमोशन करून तो शोमध्ये पुनरागमन करणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, अली म्हमाला कपिल आणि माझ्यात जे घडले तो अपघात होता... 

 
बातम्या आणखी आहेत...