आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B’day: एकेकाळी ड्रग्स अ‍ॅडिक्ट असलेल्या या हॉलिवूड बालाने बालपणीच सुरू केले होते मॉडेलिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- लिंडसे लोहाना
अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल लिंडसे लोहाना आज तिचा 28वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 3-या वर्षी तिने मॉडेलिंगला सुरूवात केली होती. लिंडसेने 11व्या वर्षी 1998मध्ये सुरू झालेल्या 'द पॅरेंट्स ट्रॅप'च्या रिमेकमधून फिल्मी करिअरला सुरूवात केली.
तिने केल्विन क्लीन किड्स, एबरक्रॉम्बो किड्ससारख्या फॅशन ब्राँड्ससाठी मॉडेलिंग केले. लोहानाने 2004मध्ये 'स्पीक' अल्बमसह पाश्चिमात्य संगीत करिअरला सुरूवात केली. 2005मध्ये 'ए लिटल मोअर पर्सनल (रॉ)' नावाचा एक वेगळी अल्बम तयार केला.
ड्रग्स अ‍ॅडिक्ट होती लोहाना
लोहाना कधीकाळी ड्रग्स अ‍ॅडिक्ट होती. तिने या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आता ती त्यातून पूर्णत: बाहेर पडली आहे. तिला एका न्यायाधिशांनी 90 दिवस कैद करून शिक्षा सुनावली होती. तेव्हा लोहाना या व्यसनापासून मुक्त झाली. नशेत धुंद होऊन गाडी चालवताना दोनदा अपघाताला सामोरे गेलेल्या लोहानाला अटकही करण्यात आली होती. व्यसानाच्या वाईट कारणामुळे 2007मध्ये तिचे करिअर जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते. ऑगस्ट 2013मध्ये पुन्हा एकदा तिला व्यसनमुक्त केंद्रात घेऊन जाण्यात आले होते.
फिल्मी करिअर
आतापर्यंत 20पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीच्या मुख्य सिनेमांमध्ये 'द पॅरेंट ट्रॅप' (1998), 'फ्रिकी फ्रायडे' (2003), 'मीन गर्ल्स' (2004), 'जस्ट माय लक' (2005), 'आय नो हू किल्ड मी' (2007) हे सिनेमे सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा लिंडसे लोहानाच्या बालपणीपासून ते आतापर्यंतची छायाचित्रे...