आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amy Adams, Meryl Streep, Cate Blanchett Attend Philip Seymour Hoffman’S Funeral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्कर विजेते फिलिप हॉफमॅन यांच्यावर अंत्यसंस्कार, उपस्थितांना अश्रू अनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्कर विजेते अभिनेता फिलिप हॉफमॅन यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी न्यूयॉर्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह हॉलिवूडमधील त्यांचे मित्र हजर होते. गेल्या रविवारी फिलिप यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. न्यूयॉर्क येथील अपार्टमेंटमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या मृतदेहाजवळ काही इंजेक्शन आणि एक पुडी सापडली होती. त्यात हेरॉइन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस हॉफमॅन यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या वृत्तात म्हटले होते, की हॉफमॅन ज्या अपार्टमेंटमध्ये राहात होते, तेथील बाथरूममध्ये ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या हातात इंजेक्शनची सुई होती.
2005 मध्ये हॉफमॅन यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता. तसेच उत्कृष्ट सहकलाकारासाठी तीन वेळा त्यांना नामांकन मिळाले होते.
हॉफमॅन यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या आई मर्लिन ओ'कॉर्न यांच्यासह जोकीन फीनिक्स, केट ब्लँकेट, जस्टिन थेरॉक्स, मायकल विलियम्स आणि एलेन बर्स्टिन हे कलाकार हजर होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा हॉफमॅन यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...