आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँजेलिना जोलीने चाखले भारतीय पदार्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लज्जतदार अणि चटपटीत भारतीय खाद्य पदार्थांची महती सर्वांनाच मान्य आहे. हॉलीवूड स्टार अँजेलिना जोलीही चटपटीत भारतीय खाद्य पदार्थांच्या प्रेमात पडली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय पदार्थांवर तिने ताव मारला.

लाम भुना, चिकन कोरमा, चिकन टिक्का अशा लज्जदार खाद्य पदार्थांची चव अँजेलिना जोलीने चाखले. 37 वर्षीय ब्रॅड पिटकडे तिने या पदार्थांची मागणी केली होती. त्यानंतर भारतातून खास ऑर्डर देऊन लॉस एंजलिसमधील त्याच्या घरी हे पदार्थ मागवून घेण्यात आले. ब-याच दिवसांपासून ब्रँजोलिना जोडपे भारतीय पदार्थांना मिस करत होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.