आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Angelina Jolie And Brad Pitt Daughter Makes Her Hollywood Movie

अँजेलिना जोलीच्या पाच वर्षीय मुलीची हॉलिवूडमध्ये एंट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीचा 'मॅलेफिसेंट' या आगामी सिनेमाचा पोस्ट रिलीज झाला आहे. या सिनेमात जोलीची पाच वर्षांची मुलगी विवियन पॅटसुध्दा अभिनय करताना दिसणार आहे. सिनेमाच्या पोस्टवर अँजेलिना आणि विवियन यांनी एकत्र बघितल्या गेले आहे. यंदा मेमध्ये रिलीज होणा-या या सिनेमाचे ऑफिशिअल ट्रेलरसुध्दा लाँच करण्यात आले आहे.
प्रसिध्द कहाणी 'सिलपिंग ब्यूटी'वर आधारित डिजनीच्या 'मॅलेफिसेंट' या सिनेमात अँजेलिना प्रिंसेस आरोरा या क्रूर राणीची भूमिका साकारणार आहे. तसेच विवियनने प्रिंसेस आरोराच्या बालपणीची भूमिका साकारली आहे.
अँजेलिना-ब्रेड यांची पाच वर्षांची मुलगी विवियन ही कमाईच्या बाबतीतसुध्दा मागे नाहीये. सुत्रांच्या सांगण्यानुसार, विवियनला एका आठवड्यात तीन हजार डॉलर इतका पगार असून 60 डॉलर तिच्या पॉकेट मनीचा खर्च आहे. अर्थातच तिची आठवड्याची कमाई जवळपास 1.64 लाख रुपये असून या कमाईसोबतच बालकलाकाराच्या भूमिकेत सर्वाधिक कमाई करणारी बालकलाकार म्हणून संबोधली जाते. ही सिनेमा 20104मध्ये होणार आहे.
या सिनेमात विवियनची मोठी बहिण सिलोहलासुध्दा काम कतरण्याची इच्छा होती. परंतु काही कारणास्तव ती काम करू शकली नाही.
सिलोहने ब्रॅड पिटच्या प्रसिध्द 'द क्यूरिअस केस ऑफ बेजामिन बटन' या सिनेमात नवजात मुलीची भूमिका केली होती.